राज ठाकरेंचा उदय सामंतांना फोन, शक्य तितक्या लवकर ग्रंथालये सुरू करु, सामंतांकडून आश्वासन
उदय सामंत यांनी याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अस आश्वासन राज ठाकरेंना दिलं. (Raj Thackeray Call Uday Samant Regarding Library Reopen)
मुंबई : राज्यातील ग्रंथालय प्रतिनिधींनी आज (8 ऑक्टोबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रंथालय पुन्हा सुरु करा, अशी मागणी राज यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी तात्काळ उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन करत ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर उदय सामंत यांनी याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अस आश्वासन राज यांना दिलं. (Raj Thackeray Call Uday Samant Regarding Library Reopen)
राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी तात्काळ उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन केला. त्यांच्यासमोर ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या. तसेच राज्यातील ग्रंथालयं सुरु करण्यास परवानगी देण्याची विनंती केली.
त्यानतंर उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या विनंतीला मान देत, शक्य तितक्या लवकर ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन त्यांना दिलं.
पुस्तकं ही सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात त्याची फार आवश्यकता आहे. म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये बंद केलेली ग्रंथालये पुन्हा सुरु करण्यात यावीत. त्यामुळे वाचन चळवळ वृद्धिंगत होईल. त्यावर अवलंबून असलेल्या अर्थचक्रालाही गती मिळेल, असे मत ग्रथांलय प्रतिनिधींनी राज ठाकरेंसमोर मांडलं होतं.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनलॉक सुरु आहे. त्यानंतर डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या सर्वांनी राज ठाकरेंकडे विविध मागण्यांचं साकडं घातलं होतं. यानंतर काही समस्यांवर तोडगाही निघाला होता. त्यामुळे अनेकांना विश्वास वाटत आहे.(Raj Thackeray Call Uday Samant Regarding Library Reopen)
संबंधित बातम्या :
राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, ग्रंथालय प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीला
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीला चाप लावा, राज ठाकरेंची पत्राद्वारे मागणी