मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत, कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? संदीप देशपांडेंचा टोला

कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का?" असा टोलाही संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. (Sandeep Deshpande On Maharashtra Hotels Reopening) 

मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत, कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? संदीप देशपांडेंचा टोला
संदीप देशपांडे आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 9:45 AM

मुंबई : राज्यात लवकरच अनलॉक 5 ची घोषणा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले आहे. राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. (Sandeep Deshpande On Maharashtra Hotels Reopening)

“अनलॉक 5 सुरू होणार आहे, मुख्यमंत्र्यांनी हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का?” असा टोलाही संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुण्यासह औरंगाबाद, नागपूरमधील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. कोरोनाच्या संकट काळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचं समाधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. अवघा महाराष्ट्र माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे, तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“हॉटेल सुरु केल्यावर मी पुन्हा पाहायला येणार नाही”

“हॉटेल सुरु केल्यानंतर ते पुन्हा बंद करावे लागणार नाही याची जबाबदारी हॉटेल मालकांवर असेल. हॉटेल मालकच माझे कॅमेरा आहेत. त्यांनीच मला सांगायला पाहिजं की आम्हाला कोरोना नियंत्रण करायचं आहे. थोडे दिवस थांबा. तुम्ही परवानगी द्या. एकदा का हॉटेल सुरु केलं, तर जबाबदारीने चालवले पाहिजे. हॉटेल मालकांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि हॉटेल कसे चालवणार याची विशेष पद्धत (SOP) सरकारला द्यावी. आणखी काही सूचना असतील तर जरुर करा. पण एकदा हॉटेल सुरू केल्यानंतर मी तुमच्याकडे बघायला येणार नाही. तुम्ही माझे परिवार-सहकारी म्हणून काम केलं पाहिजे. मी कुणावर पाळत ठेवणार नाही,” असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. (Sandeep Deshpande On Maharashtra Hotels Reopening)

संबंधित बातम्या : 

Restaurant | रेस्टॉरंट ऑक्टोबरपासून पुन्हा उघडण्याची चिन्हं, मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्सची ‘रेसिपी’

तुम्ही माझे कॅमेरे, जबाबदारी तुमच्यावर, मुख्यमंत्र्यांचा रेस्टोरंट मालकांशी संवाद

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.