56 मार्कांचा पेपर, 2 दिवसांचा अवधी, मनसेचा मोदींवर ‘पेपर स्ट्राईक’
नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नसला, तरी ‘मोदी शाह मुक्त भारत’ ही घोषणा देत महाराष्ट्र पिंजून काढला. राज्यभरात ठिकठिकाणी एकूण दहा सभा घेऊन राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला. राज ठाकरेंची नाशिकमध्ये शेवटची प्रचारसभा पार पडल्यानंतर, आता मनसैनिक कामाला लागले […]
नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नसला, तरी ‘मोदी शाह मुक्त भारत’ ही घोषणा देत महाराष्ट्र पिंजून काढला. राज्यभरात ठिकठिकाणी एकूण दहा सभा घेऊन राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला. राज ठाकरेंची नाशिकमध्ये शेवटची प्रचारसभा पार पडल्यानंतर, आता मनसैनिक कामाला लागले आहेत. राज ठाकरेंवर भाजपकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसैनिक सरसावले आहेत.
नवी मुंबई शहरातील मनसेने राज ठाकरेंच्या प्रचारसभांमधील मुद्द्यांना बळ देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 56 इंचाची प्रश्नपत्रिका तयार करुन, दोन दिवसात प्रश्नपत्रिका सोडवण्याचे मनसेने भाजपच्या नेत्यांना जाहीररित्या आव्हान दिले आहे.
“आम्ही 56 गुणांची प्रश्नपत्रिका प्रकाशित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजपला दोन दिवसांचा आम्ही अवधी देतो, त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवून दाखवावी. तसेच, आशिष शेलारांना राज साहेबांच्या प्रश्नांना उत्तर देता आले नाही, किमान ही प्रश्नपत्रिका तरी सोडवावी.” असे आव्हान नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिले आहे.
नवी मुंबई शहर मनसेने प्रकाशित केलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सर्वसामान्य शाळेतील प्रश्नपत्रिकेसारखीच आहे. मात्र, यातील एका वाक्यात प्रश्न, पर्यायी प्रश्न, रिकाम्या जागा भरा, संदर्भासहित स्पष्टीकरण इत्यादी अगदी हटके आहेत. प्रत्येक प्रश्नातून भाजपची गोची होताना दिसतेच, सोबत टोलेही लगावले आहेत. या प्रश्नपत्रिकेची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.
मनसेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी :