“माझी पोरं काय करतील कळणार नाही, मग आरशासमोर, पोट, पाठ आणि गाल…”, राज ठाकरे यांचा निर्वाणीचा इशारा

आपल्याकडे फक्त जातीचं राजकारण केलं जातं. जातीच्या राजकारणातून माथी भडकवली जाते. काल शिवसेनेचा जिल्हाप्रमुख त्याला आमच्या पोरांनी मार मार मारलं. नशिब पोलीस मध्ये पडले.

माझी पोरं काय करतील कळणार नाही, मग आरशासमोर, पोट, पाठ आणि गाल..., राज ठाकरे यांचा निर्वाणीचा इशारा
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 2:42 PM

Raj Thackeray Warns Opposition : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. यामुळे अनेक मराठा संघटना आक्रमक झाल्या. बीड जिल्ह्यातून त्यांचा ताफा जात असताना शुक्रवारी, 9 ऑगस्ट रोजी त्यांच्या ताफ्यावर काही लोकांनी सुपारी फेकली. आता या घडलेल्या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे यांनी भाष्य केले.

राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील यांना कळणार पण नाही, असा निर्वाणीचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. तसेच यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे पुन्हा एकदा वक्तव्य केले.

“जातीच्या राजकारणातून माथी भडकवली जातात”

“बाबासाहेब आंबडेकर, त्यांच्या आधी ज्योतिराव फुले, त्याआधी शाहू महाराज. खरं तर आरक्षण ही गोष्ट दुर्बल घटकांना या गोष्टी द्याव्यात हे शाहू महाराजांनी सांगितलं. ते सुरू झालं. पण आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे, त्याला आऱक्षण द्यावं. त्याच्या ऐवजी आपल्याकडे फक्त जातीचं राजकारण केलं जातं. जातीच्या राजकारणातून माथी भडकवली जातात. काल शिवसेनेचा जिल्हाप्रमुख त्याला आमच्या पोरांनी मार मार मारलं. नशिब पोलीस मध्ये पडले. तो ओरडत होता एक मराठा लाख मराठा, म्हणजे काय. त्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचे माणसं आहेत. यांच्याआडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे. हे लोकांसमोर आलं पाहिजे. सर्वांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे”, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

“2004 किंवा 2005 असेल तेव्हा पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळी आला होता. मुंबईत मोर्चा आला होता. माझ्याकडे या मोर्चाचा फोटो असेल. या मोर्चाच्या व्यासपीठावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोकं होते. सर्वांनी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. कुणी अडवलं. तुमचं एकमत आहे तर थांबवलं कुणी? 15-20 वर्ष झाले. तुम्ही आरक्षण का दिलं नाही”, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

“माझ्या नादी लागू नका”

“मोदी दहा वर्षापासून संसदेत आहे. मोदी म्हणाले शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो. मग शरद पवार यांनी मोदींना मराठा आरक्षणाबाबत शब्द का नाही टाकला. उद्धव ठाकरे भाजपसोबत होते , तेव्हा त्यांनी पाच वर्षात मराठा आरक्षणासाठी शब्द का टाकला नाही? जरांगेंच्या मागून राजकारण करत आहेत. तुमचं राजकारण लखलाभ असो. पण माझ्या नादी लागू नका. एवढंच सांगायचं आहे. माझी पोरं काय करतील यांना कळणारपण नाही. नंतर घरी येऊन आरशापुढे पाट, पोट आणि गाल बघावे लागेल. अत्यंत चिखल केला राजकारणाचा”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.

Non Stop LIVE Update
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.