Sandeep Deshpande | गणपतीसाठी कोकणात जाताना अडचणी, बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा : संदीप देशपांडे

नारायण राणे यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याचा मुद्दा उचलून धरला असताना आता मनसेनेही यात उडी घेतली

Sandeep Deshpande | गणपतीसाठी कोकणात जाताना अडचणी, बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा : संदीप देशपांडे
Follow us
| Updated on: Jul 20, 2020 | 10:45 AM

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मुद्द्यावरुन राज्यात चांगलेच राजकारण रंगत आहे. “परराज्यातील लोकांना पाठवलं, ते परतही आले, मात्र कोकणात जाण्यासाठी शासनाने काहीच व्यवस्था केलेली नाही” अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आहेत, मात्र बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा दिल्या” अशी बोचरी टीकाही देशपांडे यांनी केली. (MNS Sandeep Deshpande attacks Thackeray Government over Ganeshotsava Guidelines)

भाजप खासदार नारायण राणे यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याचा मुद्दा उचलून धरला असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यात उडी घेतली आहे.

“कोकणवासी दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जातात, पण कोकणातल्या माणसांना आता गावी जाण्यासाठी काहीच व्यवस्था शासनाने केलेली नाही. परराज्यातल्या लोकांना पाठवलं, त्यांची व्यवस्था केली, ते जाऊन परत आलेही” असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. “गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या लोकांना अडचणी आहेत, तर बकरी ईद साजरा करणाऱ्यांना मात्र सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत” अशी टीकाही देशपांडे यांनी केली आहे.

हेही वाचा : घरच्या घरी विसर्जन, ना मिरवणूक, ना गर्दी, गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्स जारी 

“राज्य शासनाने चाकरमान्यांसाठी काही सुविधा करावी, कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी सरकार बसेसची सोय करु शकत नसेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना बसेसचे नियोजन करेल, आम्हाला शासनाने परवानगी द्यावी” अशी मागणी देशपांडेंनी केली आहे.

कोकणबंदी नाही

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जाणार का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

चाकरमानी आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही. तसेच जिल्हा प्रशासनाचे वृत्त हा अंतिम निर्णय नसल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. मात्र कोकणात ज्या ठिकाणाहून चाकरमानी येणार आहेत, त्याच ठिकाणी त्यांची कोविड चाचणी माफक दरात करावी, अशी मागणी विनायक राऊत शासनाकडे करणार आहेत.

तर दुसरीकडे गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या : 

Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींची उंची 4 फुटांपर्यंतच, मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 10 सूचना

गणेशोत्सवात चाकरमान्यांना ‘कोकणबंदी’ केली तर आंदोलन, राणे आक्रमक

(MNS Sandeep Deshpande attacks Thackeray Government over Ganeshotsava Guidelines)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.