आदित्य ठाकरेंवर संदीप देशपांडेंची नजर, नांदगावकरांचा गृहमंत्र्यांवर वॉच, मनसेचं संभाव्य ‘शॅडो’ खातेवाटप

मनसेच्या वरच्या फळीतील नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, शालिनी ठाकरे यांची वर्णी 'शॅडो कॅबिनेट'मध्ये निश्चित आहे. MNS Shadow Cabinet by Raj Thackeray

आदित्य ठाकरेंवर संदीप देशपांडेंची नजर, नांदगावकरांचा गृहमंत्र्यांवर वॉच, मनसेचं संभाव्य 'शॅडो' खातेवाटप
Follow us
| Updated on: Mar 09, 2020 | 9:53 AM

मुंबई : जानेवारीत महाअधिवेशन आणि फेब्रुवारीत महामोर्चा झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वर्धापन दिनाचं नियोजनही तितक्यात उत्साहाने केलेलं दिसत आहे. नवी मुंबईत आयोजित करण्यात येत असलेल्या मनसेच्या 14 व्या वर्धापन दिन सोहळ्यात काय घोषणा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाअधिवेशनावेळी ज्या ‘शॅडो कॅबिनेट’चं सूतोवाच करण्यात आलं होतं, त्याची घोषणाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज करण्याची चिन्हं आहेत. (MNS Shadow Cabinet by Raj Thackeray)

मनसेच्या वरच्या फळीतील नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, शालिनी ठाकरे यांची वर्णी ‘शॅडो कॅबिनेट’मध्ये निश्चित आहे. याशिवाय संजय शिरोडकर, शिरीष सावंत, रिटा गुप्ता यांचीही नावं चर्चेत आहेत.

बाळा नांदगावकर यांच्या गृहमंत्र्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. म्हणजेच नांदगावकर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या कारभारावर लक्ष ठेवतील. तर नितीन सरदेसाईंकडे अर्थमंत्री अजित पवारांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी मिळू शकते. संदीप देशपांडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नजर ठेवण्याची शक्यता आहे.

संभाव्य शॅडो कॅबिनेट 

बाळा नांदगावकर : गृह नितीन सरदेसाई : अर्थ अविनाश अभ्यंकर : महसूल संजय चित्रे : वने शिरीष सावंत : ऊर्जा संदीप देशपांडे : नगरविकास आणि पर्यटन अमेय खोपकर : सांस्कृतिक अभिजित पानसे : शालेय शिक्षण योगेश परुळेकर : सार्वजनिक बांधकाम संजय शिरोडकर : एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम उपक्रम शालिनी ठाकरे : महिला आणि बालकल्याण रिटा गुप्ता : आरोग्य

याशिवाय अविनाश जाधव, जयप्रकाश बाविस्कर, संतोष धुरी, यशवंत किल्लेदार, अनिल शिदोरे यासारख्या नेत्यांची नावंही चर्चेत आहेत.

दरम्यान, मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधील सहकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष सूचना दिल्याची माहिती आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत रविवारी झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी सहकाऱ्यांना सूचना दिल्या. (MNS Shadow Cabinet by Raj Thackeray)

राज ठाकरेंच्या सूचना काय आहेत?

1. कुणीही आपली स्वतःची व्हिजिटिंग कार्ड छापू नयेत. 2. आपल्या दिलेल्या खात्याचा तसेच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर होणाऱ्या निर्णयांचा सखोल अभ्यास करावा. 3. कुणीही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन त्यावर भूमिका मांडू नये. 4. आपल्याला दिलेल्या पदाचा गैरवापर करु नये. 5. शॅडो मंत्र्यांनी ब्लॅकमेलिंग करु नये, तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?

इंग्लंड आणि अमेरिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात ‘शॅडो कॅबिनेट’ची संकल्पना राबवण्याची चिन्हं आहेत. राज्य सरकारमधील प्रत्येक मंत्र्यावर नजर ठेवण्यासाठी मनसेतून एक-एका नेत्याची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी पक्षातील प्रत्येक नेता आणि सरचिटणीस यांना संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा मनसे नेते पाठपुरावा करतील. हे सर्व नेते पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड देतील.

सरकारमध्ये विरोधी पक्षाला अतिशय महत्त्व असते. पर्यायी पक्ष म्हणून तोच अधिकारावर येण्याची शक्यता असते. विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणतात. अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीत कॅबिनेट पद्धतीला सुरुवात झाली.

कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे 15 ते 20 मंत्री असतात. राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मात्र 33 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेच्या प्रत्येक नेत्याकडे दोन-दोन मंत्र्यांची जबाबदारी दिली जाण्याची चिन्हं आहेत.

वर्धापन दिनाची तयारी

मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर होणार आहे. वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा सोहळा आयोजित केला आहे. सकाळी 10 वाजता वाशी टोल नाक्यावरुन अमित ठाकरे यांची रॅली निघणार आहे. तर दुपारी 12 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशीत दाखल होणार आहेत.

मनसेचा वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंनी ‘अरुणोदय झाला’ गाणं ट्विट (MNS PartyAnniversary) करत सर्व मनसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मनसेचा नवा अजेंडा

23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले होते.

विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

आशिष शेलार-राज ठाकरे भेट

राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात पुन्हा खलबतं झाली. आशिष शेलार शनिवारी सकाळी एक तास ‘कृष्णकुंज’वर असल्याची माहिती आहे. गेल्या 20 दिवसांत आशिष शेलार हे चौथ्यांदा राज ठाकरे यांच्या भेटीला ‘कृष्णकुंज’वर गेले होते. त्यामुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाणं आलं आहे. आगामी औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांचे सूर जुळण्याची शक्यता आहे. (MNS Shadow Cabinet by Raj Thackeray)

संबंधित बातम्या :

मिलिंद एकबोटे-राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर मिलिंद एकबोटे म्हणतात…

मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत, शॅडो कॅबिनेट जाहीर होण्याची शक्यता

“ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल”, गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.