राज ठाकरेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, भूमिपूजन कोण करतं याला महत्त्व नाही; मनसेचा टोला

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं आज भूमिपूजन होणार आहे. (mns slams shivsena over Thackeray Memorial Bhumi Pujan Ceremony)

राज ठाकरेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, भूमिपूजन कोण करतं याला महत्त्व नाही; मनसेचा टोला
raj thackeray
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 11:02 AM

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं आज भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनाचं अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे मनसेचा संताप उडाला असून मनसेने शिवसेनेवर टीकाही केली आहे. (mns slams shivsena over Thackeray Memorial Bhumi Pujan Ceremony)

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे. बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत, हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तिच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

फडणवीस, राज यांना निमंत्रण हवे होते

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या भूमिपूजन सोहळ्याला विरोधकांना न बोलावल्याने नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांना भूमिपूजन सोहळ्याला बोलवायला हवं होतं. बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सर्व पक्षीय नेत्यांना बोलावण्यात आलं होतं. या प्रसंगीही सरकारने तसं करायला हवं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रचंड प्रयत्न केले होते. त्यांनी लागणाऱ्या परवानग्या मिळवून दिल्या होत्या. त्यांना बोलवायला हवे होते. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली.

आज भूमिपूजन

बाळासाहेबांच्या स्मारकाचं आज भूमिपूजन होणार आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमाची माहिती दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यानंतर संध्याकाळी 5.00 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहेत. (mns slams shivsena over Thackeray Memorial Bhumi Pujan Ceremony)

संबंधित बातम्या:

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन, कार्यक्रमाच्या परवानगीसाठी विशेष प्रयत्न

अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती, मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तींकडून चौकशी

(mns slams shivsena over Thackeray Memorial Bhumi Pujan Ceremony)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.