Konkan Graduate Constituency : मोठी बातमी, कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार, पडद्यामागे काय राजकारण घडलं? VIDEO

Konkan Graduate Constituency : कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेने माघार घेतली आहे. हा निर्णय आश्चर्यकारक आहे. कारण मनसेकडून अभिजीत पानसे यांनी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे, म्हणून महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा अन्य निवडणुकीशी संबंध नाही असं मनसे नेते सांगत होते. पण आता अचानक पडद्यामागे काय घडलं?

Konkan Graduate Constituency : मोठी बातमी, कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार, पडद्यामागे काय राजकारण घडलं? VIDEO
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 9:07 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती. पण आता अचानक मनसेने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. नितीन सरदेसाई यांनी मीडियाशी बोलण्याआधी भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. “प्रत्येक निवडणुकीची एक थिअरी असते. महायुती एकत्र राहील असा विश्वास आहे. बरेच वर्षाचे संबंध आहेत. मी आशिर्वाद घ्यायला आलो होतो” असं निरंजन डावखरे म्हणाले. “देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती, त्या विनंतीला मान देऊन आम्ही माघार घेत आहोत” असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं. अभिजीत पानसे यांनी कोकण पदवीधरची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती. सातत्याने ते नोंदणी करुन घेत होते. राज ठाकरेंनी सुद्धा या निवडणुकीत लक्ष घातलं होतं.

मनसेने हा निर्णय का घेतला? त्या बद्दल नितीन सरदेसाई यांनी माहिती दिलीय. “दोन दिवसापूर्वी 3 जूनच्या संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली, त्या विनंतीला मान देऊन राज ठाकरे यांनी कोकण पदवीधरची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. पानसे अर्ज भरणार नाहीत, निरंजन डावखरे उमेदवार असतील” असं नितीन सरदेसाई म्हणाले.

‘त्या बद्दल राज ठाकरेच बोलतील’

“आज सकाळी निरंजन डावखरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांनी राज ठाकरे यांचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं” असं सरदेसाई म्हणाले. तुम्ही निरंजन डावखरे यांना समर्थन देणार का? या प्रश्नावर नितीन सरदेसाई म्हणाले की, “त्या बद्दल राज ठाकरेच बोलतील. पण अशी गोष्ट वारंवार होणार नाही” “देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. आमचा स्वतंत्र पक्ष आहे. या वेळेला पाठिंबा दिला आहे. अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही, हे सुद्धा स्पष्ट केलय” असं नितीन सरदेसाई म्हणाले. ‘मनसेच्या बाबतीत असं वारंवार का होतं?’

मनसेची तयारी नव्हती का? मनसेच्या बाबतीत असं वारंवार का होतं? या प्रश्नावर नितीन सरदेसाई म्हणाले की, “राजकारणात बऱ्याच गोष्टी असतात. पक्षासाठी होणारा फायदा कालांतराने दिसतो”

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.