नवी दिल्ली/मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची (bjp meeting )बैठक १६ व १७ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक (Lok Shaba election) लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाचा (cabinet minister )विस्तार होणार आहे. त्यात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार? यासंदर्भात चर्चा सुरु झालीय. शिंदे गटातून खासदार श्रीकांत शिंदे यांचा नंबर लागणार का? या प्रश्नावर श्रीकांत शिंदे यांनी टीव्ही९ शी बोलताना खुलाशा केला.
अनेक दिवसांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे विद्यामान मंत्र्यामध्ये अस्वस्था निर्माण झालीय. या विस्तारात चांगली कामगिरी नसणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. सोबतच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील काही चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात एकनाथ शिंदे गटाकडूनही काही जणांचा समावेश होणार आहे.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे
महाराष्ट्रातून विद्यामान मंत्री नारायण राणे यांना वगळले जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. तसे झाल्यास त्यांच्या जागी भाजपमधून दुसऱ्या एखाद्याला संधी मिळेल की शिंदे गटातून कोणाला मंत्रिपद दिलं जाईल, हे विस्तारातच स्पष्ट होणार आहे. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांच्यांशी टीव्ही९ ने संवाद साधला. यावेळी केंद्रात मंत्रिपदाबाबत स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही. तसेच मी या पदासाठी मी इच्छूकही नाही. आपल्यावर खासदार म्हणून मोठी जबाबदारी आहे. पक्षसंघटनेची कामे आहे. लोकांच्या कामांकडे लक्ष देणार आहे. आमच्या गटातून १३ खासदार आहेत. त्यातून प्रत्येकाला योग्य संधी मिळाली पाहिजे. तळागळातील कार्यकर्त्यांना संधी मिळाली, हीच भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला नारळ देणार व कोणाला मंत्री करणार, याची खबरबात कोणालाच नाही. परंतु २०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन काही वरिष्ठ मंत्र्यांना सरकारमधून पक्षात पाठवले जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. तथापि, हे मंत्री कोण असतील, हे विस्तारा दरम्यान धक्कातंत्राच्या माध्यमातूनच समजणार आहे.