नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ फेरबदल आणि मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला महत्वाची खाती आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आलं. (Which ministerial posts are allotted to the ministers of Maharashtra in the expansion of Union ministerial posts?)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. रात्री खातेवाटप जाहीर केल्यानंतर राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे खातं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे होतं. गडकरींकडील हे अतिरिक्त खातं काढून नारायण राणे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलीय.
PM Modi allocated Ministry of Personnel, Public Grievances & Pensions, Amit Shah – Minister of Home Affairs & Minister of Cooperation, Rajnath Singh allocated Minister of Defence, Nirmala Sitharaman allocated Minister of Finance & Minister of Corporate Affairs: Rashtrapati Bhavan pic.twitter.com/qICSmJGPrl
— ANI (@ANI) July 7, 2021
भिवंडीतील भाजपचे खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कपिल पाटलांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर खातेवाटपात पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भारती पवार यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागलीय. भारती पवार यांचं नाव अचानक समोर आलं आज त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथही देण्यात आली. त्यानंतर खातेवाटपात भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याची पदभार सोपवण्यात आला आहे.
पेशानं डॉक्टर असलेले भागवत कराड यांचीही केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागलीय. बुधवारी संध्याकाळी भागवत कराड यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर खातेवाटपात भागवत कराड यांच्याकडे महत्वाचा पदभार सोपवण्यात आलाय. कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.
रावसाहेब दानवे यांचं मंत्रिपद जाणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. पण मंत्रिमंडळ विस्तारात रावसाहेब दानवे यांची जबाबदारी वाढवण्यात आली आहे. दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री, कोळसा राज्यमंत्री आणि खाणकाम राज्यमंत्री अशा 3 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रिपद ? भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रकांत पाटील म्हणाले…
Which ministerial posts are allotted to the ministers of Maharashtra in the expansion of Union ministerial posts?