‘कोण कुणाला अंगावर घेतं बघू’, नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान

नारायण राणे यांना महाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी राणे यांना जोरदार टोला लागवलाय.

'कोण कुणाला अंगावर घेतं बघू', नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान
केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिवसेना खासदार अनिल देसाई
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 9:29 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांना स्थान देण्यात आलंय. केंद्रीय मंत्री म्हणून राणे यांनी आज शपथ घेतली. नारायण राणे यांना महाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी राणे यांना जोरदार टोला लागवलाय. कोण कुणाला अंगावर घेतं हे तुम्ही बघाल, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिलीय. (MP Anil Desai’s challenge to Union Minister Narayan Rane)

भाजपने त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं आहे. बघुया ते काय करतात. हा शह वगैरे काही नाही. कोण कुणाला अंगावर घेतं ते बघा तुम्ही. कोकण आणि शिवसेना हे नेहमीच समीकरण राहिलं आहे. त्यामुळे कोकणचे लोक आणि शिवसेनेते कधीही अंतर पडणार नाही, असा दावाही अनिल देसाई यांनी केलाय. दरम्यान, कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि भाजप मजबूत करण्यासाठी राणे यांनी बळ देण्यात आल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

राणेंची पहिली प्रतिक्रिया काय?

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक चढउतार आले, त्याबाबत काय सांगाल असं विचारला आहे. 1999 ला मुख्यमंत्री झालो. त्यानंतर अनेक चढउतार आले. आता मोदींच्या नेतृत्वात हे पद मिळालं आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केलाय. तसंच शिवसेनेला शह देण्यासाठी तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा असल्याचं एका पत्रकाराने विचारलं. त्यावेळी कुणाला शह देण्यासाठी की अन्य कशासाठी मला मंत्री केलं हे माहिती नाही. फक्त मंत्री केलंय एवढं नक्की, असं मिश्किल उत्तर राणे यांनी यावेळी दिलं.

राजकीय विश्लेषकांचं मत काय?

कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि भाजपचा अधिक प्रसार करण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. तसंच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. शिवसेनेला जोरदार राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देत शिवसेनेला जोरदार उत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘शिवसेनेला शह देण्यासाठी मंत्री केलं की कशासाठी माहिती नाही, पण मंत्री केलं हे नक्की’, शिवसेनेबाबतच्या प्रश्नावर राणेंचं मिश्किल उत्तर

Modi Cabinet Reshuffle : ‘हे येरागबाळ्याचं काम नाही’, नारायण राणेंच्या शपथविधीनंतर राणे पुत्रांची पहिली प्रतिक्रिया

MP Anil Desai’s challenge to Union Minister Narayan Rane

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.