मोहन डेलकरांच्या पत्नी, मुलाच्या हाती शिवबंधन! पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारीची घोषणा

दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने शिवसेनेत प्रवेश केलाय. या प्रवेशानंतर लगेचच कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषित करण्यात आलीय.

मोहन डेलकरांच्या पत्नी, मुलाच्या हाती शिवबंधन! पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारीची घोषणा
कलाबेन डेलकर यांचा शिवसेनेत प्रवेश (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 7:13 PM

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आज डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने शिवसेनेत प्रवेश केलाय. या प्रवेशानंतर लगेचच कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषित करण्यात आलीय. (Mohan Delkar’s wife Kalaben and son Abhinav Delkar join Shivsena)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून कलाबेन डेलकर आणि अभिनव डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर कलाबेन डेलकर यांना दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी घोषित करण्यात आल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. शिवसेनेकडून भाजप नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आता डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोहन डेलकर यांची सुसाईड नोट

मरीन लाईन्स चौपाटी येथील सी ग्रीन हॉटेलमधील रूममध्ये मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी 15 पानांची सुसाईड नोट लिहिली असून, ही नोट खासदारांसाठी असलेल्या लेटरहेडवर लिहिली असल्याचं मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

कोण होते मोहन डेलकर?

58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.

डेलकरांची राजकीय कारकिर्द

मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे एकमेव विद्यमान खासदार होते

डेलकर यांची कारकीर्द कामगार संघटनेचा नेता म्हणून सुरु झाली

आदिवासी जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला

1985 मध्ये त्यांनी आदिवासी विकास संघटना सुरु केली.

1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले, अपक्ष म्हणून त्यांनी दादरा आणि नगर हवेली मतदारसंघात विजय मिळवला होता.

मग ते 1991 ते 1996 दरम्यान दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं.

मग 1998 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, त्यांच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली.

त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी पुन्हा अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.

मग 2004 मध्ये भारतीय नवशक्ती पक्षाकडून ते पुन्हा लोकसभेवर गेले.

4 फेब्रुवारी 2009 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला

मग 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन, अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

2020 मध्ये मोहन डेलकर यांनी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला होता.

इतर बातम्या :

‘चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ज्योतिरादित्य शिंदेंशी चर्चा

अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्याबाबत संपूर्ण माहिती द्यावी, किरीट सोमय्यांचं आव्हान

Mohan Delkar’s wife Kalaben and son Abhinav Delkar join Shivsena

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.