AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : मोहित कंबोज आणि फोन टॅपिंग प्रकरणातील अधिकारी रश्मी शुक्ला ‘सागर’वर; फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

Devendra Fadnavis : कंबोज यांच्या ट्विटमुळे विरोधक चांगलेच हादरून गेले होते. त्यावरून विरोधकांनी कंबोज यांच्यावर टीकाही केली होती. कंबोज यांनी स्पष्ट नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या ट्विटचा सर्व रोख अजित पवार यांच्या दिशेने असल्याने या ट्विटचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

Devendra Fadnavis : मोहित कंबोज आणि फोन टॅपिंग प्रकरणातील अधिकारी रश्मी शुक्ला 'सागर'वर; फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
मोहित कंबोज आणि फोन टॅपिंग प्रकरणातील अधिकारी रश्मी शुक्ला 'सागर'वरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 9:25 PM

मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज (mohit kamboj) आणि फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत. त्या केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यानंतरही त्या आज फडणवीस यांना भेटायला आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर आज सकाळी सिंचन घोटाळ्यावरून ट्विटवर ट्विट करून खळबळ उडवून देणारे मोहित कंबोजही सागर बंगल्यावर आले होते. कंबोज आणि रश्मी शुक्ला दोघेही एकाच वेळी सागर बंगल्यावर आल्याने अनेक त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार का? रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चाही या निमित्ताने सुरू झाल्या आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्या आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यांना महाराष्ट्रात पुन्हा बोलावलं जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे मोहित कंबोजही फडणवीस यांच्या भेटीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे. त्यांनी सिंचन घोटाळ्यावरून आज ट्विटवर ट्विट केले होते. तसेच लवकरच एक बडा नेता आत जाणार असल्याचा दावा कंबोज यांनी केल्याने खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा

कंबोज यांच्याकडून चौकशीची मागणी?

कंबोज यांच्या ट्विटमुळे विरोधक चांगलेच हादरून गेले होते. त्यावरून विरोधकांनी कंबोज यांच्यावर टीकाही केली होती. कंबोज यांनी स्पष्ट नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या ट्विटचा सर्व रोख अजित पवार यांच्या दिशेने असल्याने या ट्विटचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कंबोज आज फडणवीस यांना भेटायला आल्याने या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. कंबोज हे फडणवीस यांना आरोपांवरील पुरावे देण्यासाठी आलेत का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. तसेच त्यांनी सिंचन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केल्याचंही सांगितलं जात आहे.

म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं.
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?.
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?.
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला.
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा.
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ.
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर.
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.