Video : मातोश्रीसमोरच मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला! कलानगर परिसरात गोंधळ

मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीसमोरुन जात असताना शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला.

Video : मातोश्रीसमोरच मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला! कलानगर परिसरात गोंधळ
मोहित कंबोजImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 9:52 PM

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला (Attack on Mohit Kamboj Car in front of Matoshree) केला आहे. मोहित कंबोज यांनी अनेक भोंगे वाटले होते. तेव्हापासून मोहित कंबोज चर्चेत होते. मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीसमोरुन जात असताना शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. कलानगर सिग्नल परिसरात मोहित कंबोज यांची गाडी थांबली होती. मोहित कंबोज यांच्याकडून या परिसराची रेकी केली जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर मोहित कंबोज यांच्या गाडीवर निशाणा साधला गेलाय. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ धाव घेत मोठा अनुचित प्रकार होण्यापासून रोखलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली. रवी राणा आणि नवनीत राणा यांना मदत करण्याच्या हेतून मोहित कंबोज कलानगर इथं आले असावेत, असाही एक तर्क लढवला जातोय. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची हा हल्ला चढवला, अशी चर्चा रंगली आहे.

प्रवीण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया :

राज्यात अराजकता असल्याचं हे उदाहरण असल्याचं भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा निषेधार्ह आहे, असंही त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी मात्र मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. रेकी करण्यासाठीच मोहित कंबोज कलानगर परिसरात आलेले होते, असं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे. कंबोज यांनी डिवचल्यामुळेच मोहित कंबोज यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला असावा, असं विनायक राऊत यांनी म्हटलंय.

रेकी करत होते तर पोलिस झोपले होते का?

दरम्यान, मोहित कंबोज जर रेकी करायला आले होते, तर मुंबई पोलीस झोपले होते का, असा सवालही अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. राज्यात अराजकता असल्याचं या घटनेतून सिद्ध झाल्याचंही अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.

प्रसाद लाड यांचं आव्हान…

प्रसाद लाड यांनी मोहित कंबोज यांची बाजू घेत शिवसेनेच्या विनायक राऊत यांना फटकारलंय. मोहित कंबोज माझ्या गाडीत बसले होते. ते माझ्या गाडीतून उतरुन मागे त्यांच्या गाडीत गेले. त्यानंतर माझी गाडी पुढे गेली. मग मला मोहित कंबोज यांनी गाडीवर हल्ला झाल्याचं मला फोन करुन सांगितलंय, अशी माहिती प्रसाद लाड यांनी फोनवरुन बोलताना दिली आहे. पोलिसांच्या जीवावर दादागिरी करत असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. रेकी करण्याचा मोहित कंबोज आले असल्याचा खोटारडा आरोप केला जात असल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ : नेमकं काय घडलं मातोश्रीसमोर!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.