राणेंच्या घराबाहेर पोलिसांच्या काठ्या खाणारा शिवसैनिक मोहसीन शेखला बढती! मोहसीन काय म्हणतो?

आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख (Mohsin Shaikh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बढतीनंतर 'मी पद मिळवण्यासाठी आंदोलन केलं नाही तर आमचं दैवत असलेले शिवसेना पक्षप्रमुख आणि लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत राणेंच्या केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी केल्याचं' मोहसीनने म्हटलंय.

राणेंच्या घराबाहेर पोलिसांच्या काठ्या खाणारा शिवसैनिक मोहसीन शेखला बढती! मोहसीन काय म्हणतो?
आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 8:01 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या घरासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. त्यावेळी भाजप आणि युवासेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आहे. तेव्हा युवासेनेचा पदाधिकारी असलेल्या मोहसीन शेखला पोलिसांच्या लाठ्यांचा चांगलाच प्रसाद मिळाला होता. त्यानंतर आता युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोहसीनला मोठं बक्षीस दिलं आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख (Mohsin Shaikh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बढतीनंतर ‘मी पद मिळवण्यासाठी आंदोलन केलं नाही तर आमचं दैवत असलेले शिवसेना पक्षप्रमुख आणि लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत राणेंच्या केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी केल्याचं’ मोहसीनने म्हटलंय. (Reaction of ShivSainik Mohsin Sheikh who was beaten by the police)

मला पद मिळवण्यासाठी मी हे केलेलं नाही. आमचे दैवत असलेले पक्षप्रमुख आणि लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मी आंदोलनात सहभागी झालो होतो. पण समोरुन पेव्हरब्लॉक, दगडफेक करण्यात येत होती. त्याला विरोध करताना पोलिसांकडून मारहाण झाली असलं मोहसीनचं म्हणणं आहे. मी कट्टर शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आम्हाला चॅलेंज केलं तर त्याला आम्ही विरोध करणारच. मी मुस्लीम असलो तर कट्टक शिवसैनिक आहे. माझ्यासाठी पक्षप्रमुख आणि संघटना महत्वाची आहे. युवासेनेचं पद मिळाल्यानंतर जबाबदारी वाढली आहे. पक्षासाठी अखेरपर्यंत काम करत राहणार, असं मोहसीन शेखने म्हटलंय.

कोण आहेत मोहसीन शेख, राजकीय पार्श्वभूमी कोणती?

मोहसीन शेख शिवसेनेत येण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. परंतु काही कारणांनी त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या 2 वर्ष अगोदर म्हणजेच 2017 ला राष्ट्रवादीला बायबाय करत शिवसेना भगवा झेंडा खांदयावर घेतला. शिवसेनेत आल्यापासून त्यांनी चांगलं काम केलं. गेल्या 4 वर्षात आपल्या कामाने त्यांनी पक्षनेतृत्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. युवासेनेच्या जनसंवाद यात्रेतही मोहसीन शेख सहभागी होता. तसंच युवासेनेच्या अनेक कार्यक्रमात मोहसीन शेख अग्रक्रमाने पुढे असतो. साहजिक त्याने आपल्या कामाची छाप सोडली आहे.

पत्नी राष्ट्रवादीची नगरसेविका

विशेष म्हणजे मोहसीन शेख यांची पत्नी आणखीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. मानकूर्द शिवाजीनगरच्या त्या नगरसेविका आहेत. पत्नी राष्ट्रवादीत आणि मोहसीन शेख शिवसेनेत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं.

संबंधित बातम्या :

राणेंच्या घराबाहेर जाऊन ताकद दाखवली, आधी उद्धव ठाकरेंकडून शाबासकी, आता आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस

शाब्बास पठ्ठ्यांनो! राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन ताकद दाखवणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

Reaction of ShivSainik Mohsin Sheikh who was beaten by the police

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.