कन्फ्युजन का? आम्हाला ओबीसीतून नको, आमचंच आरक्षण द्या, संभाजीराजेंचं वडेट्टीवारांना उत्तर

"आम्हाला ओबीसीतून आरक्षण नको, आम्हाला आमचंच आरक्षण द्या. ओबीसींचं आरक्षण हे ओबीसींचं आरक्षण आहे. कन्फ्युजन नको", असं म्हणत खासदार छत्रपती संभाजेराजेंनी विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला.

कन्फ्युजन का? आम्हाला ओबीसीतून नको, आमचंच आरक्षण द्या, संभाजीराजेंचं वडेट्टीवारांना उत्तर
sambhajiraje chhatrapati
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 4:35 PM

मुंबई : “आम्हाला ओबीसीतून आरक्षण नको, आम्हाला आमचंच आरक्षण द्या (Chhatrapati Sambhajiraje Criticize Vijay Wadettiwar). ओबीसींचं आरक्षण हे ओबीसींचं आरक्षण आहे. कन्फ्युजन नको”, असं म्हणत खासदार छत्रपती संभाजेराजेंनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला. तसेच, वडेट्टीवारांनी माझ्या वाक्याचा गैर अर्थ काढला, असंही ते म्हणाले (Chhatrapati Sambhajiraje Criticize Vijay Wadettiwar).

“ओबीसीमधून आरक्षण आम्हाला घ्यायचं नाहीये. आम्ही एसईबीसीमधून आरक्षण मागितलं आहे. तो वेगळा प्रवर्ग आहे. ओबीसींचं आरक्षण हे ओबीसींचं आरक्षण आहे. कन्फ्युजन नको. एसईबीसीचं आमचं आहे (Maratha Reservation). जे ईडब्ल्यूएस म्हणत आहेत, ते वेगळं आहे, केंद्राचं आहे. त्यातून जर धोका निर्माण होत असेल तर ते कोण घेणार? त्याबाबत जे भूमिका घेत आहेत, त्यांनी समाजाला लिहून द्यावं”, असं म्हणत संभांडजीराजेंनी वडेट्टीवारांवर घणाघात केला.

तलवार कुणाविरोधात उपसणार?, वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

“राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?”, असा थेट सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता संभाजीराजे छत्रपतींना विचारला होता. तसेच, ओबीसीविरोधात, दलितविरोधात, तलवारीची भाषा कशासाठी, असंही त्यांनी विचारलं होतं. त्यावर आता संभाजीराजेंनी वडेट्टीवारांना उत्तर दिलं आहे.

संभाजीराजेंचं उत्तर

“माझी सगळी जर भाषणं पाहिली तर त्यांच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं होतं, जो ठोक मोर्चा झाला, त्यात अनेकांनी मला सांगितलं की राजे तुम्ही आहात म्हणून आम्ही तलवारी म्यान केल्या. माझ्या वाक्याचा गैर अर्थ काढला. मी उलट म्हणालो की, वेळ पडली तर मी तलवार काढेन, असं म्हणालो. राजे तुम्ही, समाजाला दिशा देण्याचं काम आमचं आहे. वेळ मारुन नेण्यासाठी हे केलं. अभ्यास करुन मग भाषण करुन बोलावं”, असं म्हणत संभाजीराजेंनी वडेट्टीवारांना खडेबोल सुनावले (Chhatrapati Sambhajiraje Criticize Vijay Wadettiwar).

…तर माझी छत्रपती घराण्याचा वंशज म्हणवण्याची पात्रता नसेल – संभाजीराजे

“दलित, ओबीसीविरोधी जर मी बोललो असेल तर माझी छत्रपती घराण्याचा वंशज म्हणवण्याची पात्रता नसेल. मी काय केलं, त्यांनी पूर्ण भाषण ऐकलं तर त्यांना समजेल. काल मी स्टेटमेंट केलं, ज्यात मी सांगितलं की ओबीसी आणि दलितांचं हित बिघडेल, अशी माझी कधीच भूमिका नव्हती”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“दोन्ही छत्रपती घराण्याचे वंशज, दोघांची मत भिन्न आहेत, पण आम्ही समाजासाठी काम करतो आहे. आमची मतं भिन्न असू शकतात, मांडणी वेगळी असू शकते. पण आमचं म्हणणं एकच आहे”, असंही ते म्हणाले.

“सरकारमध्ये कोऑर्डिनेशन नाही. आधी कोऑर्डिनेट व्हायचं, पण आता तसं होत नाही. त्यामुळे ते व्हावं अशी आमची इच्छा आहे”, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

Chhatrapati Sambhajiraje Criticize Vijay Wadettiwar

संबंधित बातम्या :

राजा रयतेचा असतो, तलवार कुणाविरोधात उपसणार? वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.