स्वत:च्या स्वार्थासाठी तीन पक्ष एकत्र, काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा : सुजय विखे

जर तुम्हाला काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा," असे वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी (Sujay Vikhe Patil On Maha Vikas Aghadi) केले.

स्वत:च्या स्वार्थासाठी तीन पक्ष एकत्र, काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा : सुजय विखे
Follow us
| Updated on: Aug 18, 2020 | 4:17 PM

शिर्डी : “राज्यातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी महाविकासआघाडी सरकारची आहे. जर तुम्हाला काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा,” असे वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. “स्वतःच्या स्वार्थासाठी तीन पक्ष एकत्र आले आहे,” असा घणाघाती आरोपही सुजय विखेंनी केला. (MP Sujay Vikhe Patil On Maha Vikas Aghadi Government)

“राज्यातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी महाविकासआघाडी सरकारची आहे. प्रत्येक वेळी केंद्रावर आरोप करणे चुकीचं आहे. केंद्र सरकारवर अवलंबून राहणार असाल तर तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला?” असा प्रश्न सुजय विखेंनी केला.

“जनतेने नाकारलेलं असताना महाविकासआघाडीने सरकार स्थापन केले. स्वतःच्या स्वार्थासाठी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. मात्र जर तुम्हाला काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा,” असेही ते म्हणाले.

“कंपाऊडरला डॉक्टरांपेक्षा अधिक ज्ञान असते. त्यामुळे मी नेहमी डॉक्टरपेक्षा कंपाऊडरकडून गोळ्या घेणे पंसत करतो”, असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केले होते. त्यावरही सुजय विखेंनी प्रतिक्रिया दिली.

“खासदार संजय राऊतांचे वक्तव्य निंदनीय आहे. त्यामुळे संजय राऊतांनी डॉक्टरांची माफी मागावी. संजय राऊतांनी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांचा अवमान केला आहे. डब्ल्यू एचओ आणि डॉक्टरांपेक्षा आपण आणि आपला पक्ष जर हुशार आहात तर कोरोना का थांबवला नाही,” असा प्रश्नही सुजय विखेंना उपस्थित केला आहे.

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याबाबतचा विषय घरगुती आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही,” असेही ते म्हणाले. (MP Sujay Vikhe Patil On Maha Vikas Aghadi Government)

संबंधित बातम्या  :

ओमराजे निंबाळकर हल्ला प्रकरण, जेलमधून पळालेला आरोपी सापडला, मंदिरातून जेरबंद

धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही : आरोग्यमंत्री

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.