MP Navneet Rana 0n Ketki Chitale : केतकी चितळेनं शरद पवार यांची माफी मागावी : खा. नवनीत राणा

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी देखील आपली प्रतिक्रीया देताना केतकी चितळेच्या पोस्टचा आपण निषेध करत असल्याचे म्हटले आहे.

MP Navneet Rana 0n Ketki Chitale : केतकी चितळेनं शरद पवार यांची माफी मागावी : खा. नवनीत राणा
खासदार नवनीत राणा Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 8:17 PM

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे हनुमान चालिसा, मशीदवरील भोंग्यावरून राजकीय चिखल फेक होत असताना एका नव्याच वादाने डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहीत अभिनेत्री केतकी चितळेने खळबळ उडवून दिली. त्यानंतर तिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आवाज उठवत राण उठवून दिले. त्यानंतर तिचा अनेकांनी आपआपल्या भाषेत समाचार घेतला. यादरम्यान राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला घेणाऱ्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) केतकी चितळे प्रकरणी आपली प्रतिक्रीया दिली आहे. तसेच खा. नवनीत राणा यांनी केतकी चितळेनं (Ketki Chitale) शरद पवार यांची माफी मागावी असेही म्हटले आहे.

पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट

शरद पवार यांच्या जातीवादाचा आणि नास्तिकतेचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यानंतर आता अभिनेत्री केतकी चितळेनं पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली. केतकीच्या फेसबुक पोस्टनंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ माजलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केतकीच्या पोस्टचा तीव्र शब्दात विरोध केला जातोय. इतकंच नाही तर केतकीविरोधात अनेक ठिकाणी तक्रार तर पुणे, कळवा, गोरेगाव आणि बीडमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. अशावेळी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी देखील आपली प्रतिक्रीया देताना केतकी चितळेच्या पोस्टचा आपण निषेध करत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी पवारांचा आदर संपूर्ण महाराष्ट्र करतो. त्यामुळे आदरपुर्वक केतकीने पवांर यांची माफी मागवी.

केतकी चितळेला अखेर अटक

दरम्यान अक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याबाबत अभिनेत्री केतकी चितळेला अखेर अटक करण्यात आली आहे. कळंबोली पोलीस ठाण्यातून तिला घेऊन जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेरच जोरदार राडा केला. केतकी हाय हायच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर केतकीच्या अंगावर काळी शाईही फेकण्यात आलीय.

हे सुद्धा वाचा

केतकीला चोप दिल्याचा, अंड्यांचा प्रसाद दिल्याचा दावा

दरम्यान, कळंबोली पोलिस ठाण्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतकीवर शाईफेक आणि तिच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार यांच्यावर कुणी अशाप्रकारे टीका करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मनाली भुलारे यांनी दिलाय. तसंच केतकीला चोप दिल्याचा आणि तिच्यावर अंडे फेकल्याचा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.