मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती, नवनीत राणा राजधानीत कडाडल्या

आईबाप हे मुलांसाठी कधी रडत नसतात. उद्धव ठाकरे यांना विविध विषयांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना भेटायचे होते. | MP Navneet Rana CM Uddhav Thackeray

मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती, नवनीत राणा राजधानीत कडाडल्या
नवनीत राणा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 3:10 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खासदार नवनीत राणा (Nanneet Rana) यांनी मुख्यमंत्र्यांवर जळजळीत शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती. आईबाप हे मुलांसाठी कधी रडत नसतात. उद्धव ठाकरे यांना विविध विषयांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना भेटायचे होते. ही संधी त्यांनी साधली, असे नवनीत राणा यांनी म्हटले. (MP Navneet Rana slams CM Uddhav Thackeray)

त्या मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या निकालासंदर्भातही प्रतिक्रिया दिली. अमरावतीच्या जनतेने ज्यांना पराभूत केले ते उत्साहाच्या भरात न्यायालयात गेले. आता मला भविष्यात सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. माझी शिवसेनेसोबतची राजकीय लढाई सुरु राहील, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

माननीय न्यायालयाने या निकालास 6 आठवड्यांची स्थगिती दिली आहे,,सर्वोच्च न्यायालयाच्या सुटी असल्यामुळे आपल्या वकिलांच्या मागणीचा न्यायालयाने केला विचार या आधी सर्वोच्च न्यायालयाचे अधिन असणाऱ्या जातपडताळणी समितीने माझे जातप्रमाणपत्र तीनवेळा पूर्ण छाननी करून वैध असल्याचा अहवाल सादर केला होता. माननीय उच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिला आहे त्याचा आदर करून घटनादत्त अधिकाराचा पूर्ण वापर करून माझी सत्य भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयात जाऊन आपण दाद मागणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.

‘माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले जातेय’

गेल्या आठ वर्षांपासून अमरावती जिल्हयातील नागरिकांच्या सेवेत आपण अविरतपणे झटत असून खासदार म्हणून गेल्या 2 वर्षात आपण आपल्या जिल्ह्याचे, शेतकरी शेतमजूर,गोरगरीब, व्यापारी व महिला-विद्यार्थी यांच्या हिताचे अनेक प्रश्न लोकसभेत पपोटीडकीने मांडले. कोरोनाकाळात आपण जिल्ह्यांतील लाखो लोकांची अहोरात्र सेवा केली.

अनेकांना मदतीचा हात दिला, अमरावती जिल्ह्याच्या विकासात शून्य योगदान असणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या आड येऊन एक महिला म्हणून मला त्रास देण्याचे, जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचे व माझे खच्चीकरण करण्याचे काम केले असून हे एक राजकीय षडयंत्र आहे.मी संघर्ष करणारी महिला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल व तेथे सत्याचाच विजय होईल, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या: 

खासदार नवनीत राणा यांना धक्का, जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द

मराठा आरक्षण ते मेट्रो कारशेड, मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडल्या 11 मागण्या; वाचा सविस्तर

Uddhav Thackeray: मोदींनी सगळं गांभीर्याने ऐकून घेतलंय, आता सकारात्मक पाऊल उचलावं हीच आशा: उद्धव ठाकरे

(MP Navneet Rana slams CM Uddhav Thackeray)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.