…तर तुमची दिवाळी सुखात जाऊ देणार नाही, नवनीत राणा यांचा ठाकरे सरकारला इशारा

पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही राहीलं नाही आणि मुख्यमंत्री उद्ध ठाकरे आरामात मातोश्रीवर बसलेत अशी टीका राणा यांनी केली. तर, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असले तर आम्ही येणारी तुमची दिवाळी सुखात करु देणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

...तर तुमची दिवाळी सुखात जाऊ देणार नाही, नवनीत राणा यांचा ठाकरे सरकारला इशारा
नवनीत राणा उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 4:51 PM

संदीप राजगोळकर,टीव्ही  9 मराठी, नवी दिल्ली : गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं महाराष्ट्रतील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मराठवाड्यात आणि विदर्भात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. खासदार नवनीत राणा यांनी नुकसानभरपाई आणि मदतीच्या मुद्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही राहीलं नाही आणि मुख्यमंत्री उद्ध ठाकरे आरामात मातोश्रीवर बसलेत अशी टीका राणा यांनी केली. तर, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असले तर आम्ही येणारी तुमची दिवाळी सुखात करु देणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

हेक्टरी 30 हजार रुपये द्या

नवनीत राणा यांनी तुम्ही जोपर्यंत बांधावर जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही सजमणार नाही, असं म्हटलं आहे. प्रति हेक्टर 30 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. राज्याला तुमची गरज आहे, असं मातोश्रीबाहेर पडून शेतीच्या नुकसानाची पाहणी करावी, असं आवाहन नवनीत राणा यांनी केलं आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल तर आम्ही येणारी तुमची दिवाळी सुखात करू देणार नाही, असा इशाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खासदार राणा यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विदर्भाचा दौरा करावा, रवी राणांची मागणी

आमदार रवी राणा यांनी मराठवाड्यात सध्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. शेतकरी उद्धवस्त झाला आहे. पाण्याचा कहर झालाय, असं म्हटलंय. विदर्भातही शेतकरी संकटात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी विदर्भ, मराठवाडा दौरा करावा, शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली आहे. नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री, कृषीमंत्री दिसत नाहीत. मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर जात नाहीत, हे राज्याचे दुर्भाग्य आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली. दिवाळी पूर्वी मदत मिळाली नाही तर, शेतकरी मातोश्रीवर घुसतील, असा इशारा आमदार राणा यांनी राज्य सरकारला दिला आहे.

पूरस्थिती गंभीर, प्रशासनानं शेताच्या बांधावर यावं : पंकजा मुंडे

पूर परिस्थिती ची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत प्रशासन, शासन बांधावर पोहचले पाहिजे. मराठवाड्यात शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे , आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील रस्त्याच्या कडेला पाहणी करताये, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. राजकीय कार्यक्रमाच्या बरोबरच रस्त्यावरील शेतावर जाऊन पाहणी केली. जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांनी ठरविले तर मराठवाड्याला न्याय मिळू शकेल, आणि अशी पाऊले ते उचलतील अशी मला अपेक्षा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अन्न धान्य द्यावे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत.

 इतर बातम्या:

Marathwada Rain : 436 मृत्यू, 22 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त, मराठवाड्याची दाणादाण, मुख्यमंत्री पाहणी करणार

अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त; पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

MP Navneet Rana warns Uddhav Thackeray if Maharashtra Government not gave relief to farmers then protest in Diwali

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.