Priyanka Chaturvedi : गद्दारांना गद्दार नाही, मग महात्मा म्हणायचं का? प्रियंका चतुर्वेदींचा पुन्हा शिंदेंवर निशाणा, VIDEO
Priyanka Chaturvedi : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदानाचा दिवस जवळ येत असताना महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. व्यक्तीगत पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेंदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली. अगदी डावोसवरुन आरोप करण्यात आले.

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? म्हणून मोठ्याने ओरडत होत्या. समोरची गर्दी गद्दार, गद्दार ओरडत होती. ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार” असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या टीकेला शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं.
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर व्यक्तीगत पातळीवर टीका केली. “प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदारकी कशी मिळवली, हे लोकांना सांगितले पाहिजे. तुमचा काही संबध नसताना डावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले, हे प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितले पाहिजे” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सुद्धा या टीकेचा समाचार घेतला. प्रियंका चतुर्वेदी म्हणतात ‘माझे वडील गद्दार आहेत, हे श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलं आहे’, असं असेल, तर मग आदित्य ठाकरेंच्या कपाळावर लिहिलं पाहिजे ‘माझा बाप महा गद्दार आहे’ प्रियंका चतुर्वेदींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल
या आरोप-प्रत्यारोपादरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी काल पुन्हा एकदा प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं. “गद्दारांना गद्दार म्हणायच नाही, मग महात्मा म्हणायचं का? गद्दारांना गद्दारच म्हणणार” असं त्या म्हणाल्या. ‘मित्रो क्या ये सही हैं’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी नक्कल केली. “गद्दरांना गद्दार म्हणायचं नाही, हे तुम्हाला मंजूर आहे का? असं त्या समोरच्या गर्दीला विचारत होत्या, त्यावर समोरुन नाही, असं उत्तर येत होतं. महाराष्ट्राच्या जनतेला हे मंजूर नाही” असं त्या म्हणाल्या.