Priyanka Chaturvedi : ‘आदित्यचे ते फोटो बघा आणि मला खासदारकी द्या’, प्रियंका चतुर्वेदीवर शिवसेनेचा गंभीर आरोप
Priyanka Chaturvedi : "तुमचा काही संबध नसताना डावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले, हे ही प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितले पाहिजे" असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर अत्यंत व्यक्तीगत पातळीवरची टीका केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदारकी कशी मिळवली, हे लोकांना सांगितले पाहिजे असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे. “मराठीचा गंध नसताना, कुठलेही कर्तृत्व नसताना इतकच काय शिवसेनेशी संबंध नसताना चतुर्वेदी तुम्ही खासदारकी मिळवली. आता खासदारकीची टर्म संपत असताना तुमची जी काही तफफड सुरु आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसतेय” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
“बुलंदी सिनेमातला एक डायलॉग आहे, ‘बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मूह में हाथ डालने’ अशीच काहीशी परिस्थिती प्रियंका चतुर्वेदी यांची झाली आहे. तुमचा काही संबध नसताना डावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले, हे ही प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितले पाहिजे” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
‘स्वत:जवळ आदित्य ठाकरेंचे कसे फोटोग्राफ आहेत, हे…’
“पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी गेल्या आठड्यात कोणाकोणाला भेटलात आणि स्वत:जवळ आदित्य ठाकरेंचे कसे फोटोग्राफ आहेत, हे दाखवून तरी मला खासदारकी द्या, असे सांगणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांनी बोलताना विचार करावा आणि भान ठेवावे” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी मुंबईत एक प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रियंका चतुर्वेदी बोलत होत्या. “एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? म्हणून मोठ्याने ओरडत होत्या. समोरची गर्दी गद्दार, गद्दार ओरडत होती. ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार” असं त्या म्हणाल्या.
‘दीवार’ सिनेमाचा दाखला का दिला?
त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘दीवार’ सिनेमाचा उल्लेख केला. ‘दीवार’ सिनेमात अमिताभ बच्चन त्याचा हात दाखवतो, ‘मेरा बाप चोर हैं’ असं त्यावर लिहिलेलं असतं, तसच श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’. प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उत्तर दिलय.