काँग्रेसनंतर ‘आप’ला मोठा झटका, बनावट सही प्रकरणात खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित

आम आदमी पक्षाचे तरुण खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर बनावट सही केल्याचा आरोप आहे.

काँग्रेसनंतर 'आप'ला मोठा झटका, बनावट सही प्रकरणात खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 5:37 PM

नवी दिल्ली : काँग्रेसनंतर आम आदमी पक्षाला मोठा झटका लागला आहे. कारण आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित ( Raghav Chadha Suspended ) करण्यात आले आहे. याशिवाय आपचे दुसरे खासदार संजय सिंह यांचं ही निलंबन वाढवण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आम आदमी पक्षाच्या दोन्ही खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. राघव चढ्ढा यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप आहे. राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ज्यावरुन त्यांना निलंबित करण्यात आले आहे. जेव्हा प्रकरण विशेषाधिकार समितीकडे असते तेव्हा माध्यमांसमोर स्वत:चा बचाव करणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाते. त्यामुळे त्यांचं निलंबन झाले आहे.

राघव चढ्ढा यांच्यावरही बनावट सह्या केल्याचा आरोप?

पाच खासदारांचा असा दावा आहे की त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी मांडला. भाजपचे तीन खासदार, बीजेडी आणि एआयएडीएमकेचे एक खासदार आहेत ज्यांनी निषेध नोंदवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

हा वाद चव्हाट्यावर येताच राज्यसभेच्या उपसभापतींनी याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या पाच खासदारांमध्ये सस्मित पात्रा (बीजेडी), नरहरी अमीन (भाजप), सुधांशू त्रिवेदी (भाजप), नागालँडचे खासदार फांगनॉन कोन्याक (भाजप) आणि लोकसभेचे माजी उपसभापती थंबीदुराई यांचा समावेश आहे. थंबीदुराई हे AIADMK खासदार आहेत.

राघव चढ्ढा नोटीसला उत्तर देणार

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. विशेषाधिकार समितीने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देऊ, असे राघव चढ्ढा यांनी सांगितले होते. खासदार म्हणून आपली प्रतिमा खराब करणाऱ्या भाजपच्या डावपेचांचा मी पर्दाफाश करणार असल्याचे राघव चढ्ढा म्हणाले.

आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांच्यावरील कारवाईला कट असल्याचे म्हटले आहे. आपचे म्हणणे आहे की राघव चड्ढा या तरुण आणि प्रभावी खासदाराच्या विरोधात आपली प्रतिष्ठा खराब करण्यासाठी भाजप ही मोहीम राबवत आहे, ज्याचा पक्ष निषेध करतो. एका नवोदित तरुण, निर्भय आणि गतिमान संसदपटूवर हे निराधार आरोप आहेत आणि त्यांची प्रतिष्ठा खराब करण्याचा सुनियोजित प्रचार आहे.

संजय सिंह यांना का निलंबित करण्यात आले?

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी संजय सिंह यांना संसदेच्या संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून निलंबित केले आहे. आता विशेषाधिकार समितीची चौकशी होईपर्यंत संजय सिंह यांनाही राज्यसभेतून निलंबित करण्यात येईल, असे राज्यसभेकडून सांगण्यात आले आहे. राज्यसभेतील नेते पियुष गोयल यांनी संजय सिंह यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. जे आवाजी मतदानाने मंजूर झाले. संजय सिंग यांना ‘अशोभनीय वर्तन’ केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या मागणीवर विरोधक ठाम होते. तेव्हा सभापती जगदीप धनखर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा केली जाईल, असे सांगितले. मात्र, प्रश्नोत्तराचा तास काही मिनिटेच चालला. यानंतर संजय सिंह सभापतींच्या खुर्चीजवळही आले. अध्यक्षांनी त्यांना परत जाण्यास सांगितले, मात्र ते मान्य झाले नाहीत. त्यानंतर पीयूष गोयल यांनी त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.