बॉलरचा पत्ता नाही, पण राजू शेट्टींची जोरदार बॅटिंग
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या आधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार बॅटिंग केली. आज शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळे या गावात खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली आणि अचानक राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्ते क्रिकेटच्या मैदानावर उतरले. योगायोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाला बॅट हे चिन्ह मिळाले आहे. आज खासदार राजू शेट्टी यांनी देखील […]
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या आधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार बॅटिंग केली. आज शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळे या गावात खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली आणि अचानक राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्ते क्रिकेटच्या मैदानावर उतरले. योगायोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाला बॅट हे चिन्ह मिळाले आहे.
आज खासदार राजू शेट्टी यांनी देखील क्रिकेटच्या मैदानावर जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत देखील शेट्टी यांची अशीच बॅटिंग पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेट्टींना कोण बॉलिंग करणार हे अजून निश्चित झालेले नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राजू शेट्टी नाहीत, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, आघाडीत नसले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणारी हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने राजू शेट्टींसाठी सोडली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी यांना आव्हान देणारे कुणीच नसेल, हे स्पष्ट आहे. मात्र, भाजपकडून हातकणंगलेतून कुणाला तिकीट मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कुणीही समोर आलं, तरी आपण ‘बॅटिंग’ करायला तयार आहोत, हे राजू शेट्टींनी आपल्या कृतीतून दाखवले आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.