Exclusive : महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही; बंद पुकारून काय फायदा होईल?; संभाजीराजेंचा सवाल
खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे (Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation and Maharashtra Band).
मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे (Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation and Maharashtra Band). टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. “माझा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही. महाराष्ट्र बंद करून काही फायदा होईल का? कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच. बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही,” असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “मराठा आरक्षणावर स्थगिती मिळाल्यावर मराठा समाज दुखी होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा निकाल असतो आणि तो आपल्याला मान्य करावा लागतो. अशोक चव्हाण यांचा मला फोन आला होता. 1 वर्ष मराठा आरक्षणावर स्थगिती आहे तोपर्यंत आपण ईडब्ल्यूएसचं 10 टक्के आरक्षण आपण घेऊ असं मत त्यांनी व्यक्त केलं. मी त्यांना याला नकार दिला. त्यानंतर आम्ही मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. EWS चं आरक्षण एका जातीसाठी नाही, ते खुल्या प्रवर्गाती सर्वांसाठी आहे. जर ते आरक्षण घेतलं तर सर्वोच्च न्यायालयात आपला कोणताही दावा राहणार नाही. म्हणून मी त्यांना EWS आरक्षण घेणं धोक्याचं असल्याचं सांगितलं.”
“महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही. महाराष्ट्र बंद करून काही फायदा होईल का? कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच. बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही. त्यांनी बंद करू नये ही विनंती. छत्रपतींच्या घराण्यातील वारस म्हणून मराठा आरक्षणासाठी मी शेवटपर्यंत लढणार आहे. तरुणांनी आत्महत्या करु नये. वर्षभर कळ सोसा. सर्व नीट होईल. आत्महत्या हा पर्याय नाही,” असंही संभाजीराजे म्हणाले.
“ओबीसी आरक्षणात आम्हाला आरक्षण नको. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हवं आहे. ओबीसी नेते मला भेटत आहेत. आजही भेटणार आहेत. धनगर आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. त्यांनी कधीही बोलवावं मी त्यांच्यासोबत आहे,” असंही संभाजीराजेंनी नमूद केलं.
Exclusive व्हिडीओ पाहा :
संबंधित बातम्या :
SARTHI Meeting: सारथी संस्थेला 8 कोटींची मदत, अजित पवारांची घोषणा, वादावर पडदा
Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation and Maharashtra Band