Loksabha Election 2024 | ठरलं, कोण-किती जागा लढवणार, मविआ ‘या’ तारखेला करणार जाहीर

Loksabha Election 2024 | "महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता आहे. काहीही करुन भाजपाची हुकूमशाही पराभूत करायची हे आमच ठरलं आहे" महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला या तारखेला समोर येणार आहे.

Loksabha Election 2024 | ठरलं, कोण-किती जागा लढवणार, मविआ 'या' तारखेला करणार जाहीर
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 10:13 AM

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीच जागा वाटप किती तारखेला निश्चिच होणार? या बद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “उत्तर प्रदेशात काँग्रेस-सपामध्ये जागा वाटप पूर्ण झालय. दिल्लीत आप-काँग्रेसमध्ये जागा वाटप होईल. तामिळनाडूत चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता आहे. काहीही करुन भाजपाची हुकूमशाही पराभूत करायची हे आमच ठरलं आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“आमच जागावाटप हे अत्यंत काळजीपूर्वक आणि सुनियोजित पद्धतीने सुरु आहे. 27 तारखेला आम्ही भेटतोय. दुपारनंतर प्रमुख पक्ष, नेते एकत्र येऊन निर्णय घेणार आहोत” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “जागा वाटपासाठी महाविकास आघाडीचा असा काही फॉर्म्युला नाहीय. ज्याची जिथे ताकत आहे, तिथे तो लढणार आहे” असं संजय राऊत यांनी सांगितलं. भाजपा 32 जागा लढवणार आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “त्यांच्या गँगविषयी मी काहीही बोलणार नाही. भाजपा अनेक गँग हायर करुन निवडणूक लढत आहे. टोळी युद्धात आम्हाला पडायच नाहीय” “शिवसेना अखंड होती, तेव्हा शिवसेना-भाजपासोबत स्वाभिमानाने 23 जागांवर लढली. या वेळी सुद्धा 23 जागांवर लढू. आमची खरी शिवसेना आहे, लाचार नाही, फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत” असं संजय राऊत म्हणाले.

‘मोदींच्या खिशात 25 लाख किंमतीच पेन’

27 तारखेला उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार एकत्र येऊन जागा वाटपाबद्दल माहिती देतील असं संजय राऊत यांनी सांगितलं. “भाजपाची जागा जिंकण्याची घोषणा म्हणजे लोकशाहीची थट्टा. मोदींच्या खिशात 25 लाख किंमतीच पेन. भाजपाच्या नेत्यांकडे महागडी घड्याळ आहेत” असा आरोप संजय राऊत यांनी केला. “आमचा बाप बाळासाहेब, पण भाजपाच्या बापाचा पत्ता आहे का?. जनतेच्या लुटलेल्या पैशांवर मोदींच्या श्रीमंतीचा थाट. जनतेने ठरवलय भाजपाचे महागडे सूट उतरवायचे. भाजपाने निवडणुकीच्या तोंडावर ढोंग बंद कराव. मी वीर सावरकरांना ओळखतो, रणजीत सावरकरांना ओळखत नाही” असं संजय राऊत म्हणाले.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.