Sanjay Raut : मणिपूर पेटलय, मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं – संजय राऊत

Sanjay Raut : "सध्याची मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयानक आहे. मोदी-अमित शाह त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ देशातील जनतेने काय घ्यायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं. मणिपूर देशाच्या काळाजाचा तुकडा आहे" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : मणिपूर पेटलय, मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं - संजय राऊत
संजय राऊतImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 10:30 AM

“पंतप्रधान नरेंद्र मोदी व्लादिमीर पुतिन यांच्यासह त्यांच्या घरी बसून चहा पितात. नंतर झेलेंस्कीला भेटतात. युद्ध बंदीवर चर्चा करतात. इस्रायल- गाझा पट्टीतील युद्धाविषयी चर्चा करतात. असे फार मोठे निधड्या छातीचे नेते देशाला लाभले आहेत. पण या महान नेत्याला आमच्या देशातला मणिपूरमधला हिंसाचार थांबवता येत नाहीय, हे अपयश त्यांनी स्वीकारलं पाहिजे” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी एअर इंडिया 1 च विमान घेऊन जगभर फिरत आहेत. पण ते अजून मणिपूरला गेलेले नाहीत. मणिपूर पेटलय. देशाच्या या भागात रॉकेट, ड्रोनने हल्ले होत आहेत. नेत्यांना मारलं जातय. महिलांची इज्जत बेअब्रू होतेय. बॉम्ब हल्ले होत आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येतात. राजकीय बैठका घेतात. निवडणुकीची तयारी करतात. आमच्यावर टीका करतात. पण मणिपूरवर कधी बोलणार?. तिथे कधी Action घेणार, मणिपूर हातातून घालवायच आहे का? आता दोष द्यायला पंडित नेहरु नाहीत, तुम्ही 11 वर्षापासून सत्तेवर आहात” अशा शब्दात संजय राऊत यांनी समाचार घेतला.

‘मणिपूर देशाच्या काळाजाचा तुकडा’

“सध्याची मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयानक आहे. मोदी-अमित शाह त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ देशातील जनतेने काय घ्यायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं. मणिपूर देशाच्या काळाजाचा तुकडा आहे. मोदींनी मणिपूरला जावं, अन्यथा राजीनामा द्यावा” अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.