Sanjay Raut : ‘एक तर तू राहशील किंवा मी, हीच आपल्या….’ देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
Sanjay Raut : "एकनाथ शिंदे सारख्या चोर लफंग्यांना शिवसेना चोरता येणार नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. पुण्यातील भूमीचं महत्त्व समजून घ्या, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
“एक तर तू राहशील नाही, तर मी हे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तुम्हारे जैसे कुत्ते भोकते रहेंगे, लेकीन हम हटेंगे नही. तू राहशील नाही तर मी राहील हे सांगणारा आमचा नेता उद्धव ठाकरे आहे. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. लोकसभेत जसं पाहिजे तसं यश मिळालं नाही. दहशत पैसा आणि नवीन पक्ष सर्व काही होतं. त्यामुळे आपल्याला संघर्ष करावा लागला. पण यावेळी आपल्याला अधिक मेहनत करावी लागणार आहे. लोकसभेत अनेक ठिकाणी आपण गाफिल राहिलो. नाही तर मोदी गेलेच होते. मोदी तो गयो म्हटलं असतं” असं संजय राऊत म्हणाले. ते पुण्यात ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते.
“विधानसभेत गाफील राहू नका. नाही तर मते चोरली जातील. शिवसेनेला निवडणुका नवीन नाहीत. आपण जय आणि पराजय पाहिले आहेत. त्यातून आपण उभं राहिलो आहोत. अनेक वार आपण छातीवर आणि पाठिवर झेलले आहेत. बाळासाहेब म्हणाले, माझ्या पाठिवर एवढे वार झालेत आता नवीन घाव झेलण्यासाठी माझ्या पाठिवर जागा राहिली नाही. आपण हे सर्व सहन करून इथपर्यंत आलो आहोत” असं संजय राऊत म्हणाले.
‘एकनाथ शिंदे सारख्या चोर लफंग्यांना….’
“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आपण संघर्ष करत आलो आहोत. उद्धव ठाकरे यांचा तो त्रागा आहे, एक तर तू राहील, नाही तर मी राहील. हीच आपली टॅग लाईन आहे. हाच आपला विजयाचा मंत्र आहे. उद्याच्या निवडणुकीत एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, या जिद्दीने मैदानात उतरा. या मैदानात मीच राहील, तूच जाशील असं म्हटलं पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले. “एकनाथ शिंदे सारख्या चोर लफंग्यांना शिवसेना चोरता येणार नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. पुण्यातील भूमीचं महत्त्व समजून घ्या, असं संजय राऊत यांनी सांगितलं.