Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : वर्षावर कधी रहायला जाणार ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आता संजय राऊत म्हणतात…

Sanjay Raut : "मूळात एकनाथ शिंदे यांचं सरकार अंधश्रद्धेतून निर्माण झालय. आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार EVM घोटाळ्यातून निर्माण झालं. हे त्यांनी मान्य करावं, मी काय सांगतो हे समजून घ्यायाला शहाणा माणूस हवा, सगळा वेड्यांचा बाजार. आम्ही शिवसेनेचे लोक काय सांगतो, ते त्यांना कधीच कळणार नाही, त्यांच्या डोक्यात गुंगी भरलेली आहे" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : वर्षावर कधी रहायला जाणार ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आता संजय राऊत म्हणतात...
देवेंद्र फडणवीस, संजय राऊतImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 1:10 PM

“मी काल संसदेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना या देशात जी दुर्घटना घडली प्रयागराज महाकुंभ उत्सवात. महाकुंभ आमच्या सगळ्यांसाठी श्रद्धेचा, आस्थेचा धर्माचा विषय आहे. आम्ही सगळेच त्याच्याशी भावनिक नात्याने जोडलेलो आहोत. शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्नान करुन आले. मी पुढच्या आठवड्यात स्वत: कुंभला जाण्याची योजना आखत आहे” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “शेवटी दुर्घटना घडली, त्याला कोणीतरी जबाबदार आहे. त्या दिवशी ज्या पद्धतीने चेंगराचेंगरी झाली, याची कारणं काय आहेत आणि नक्की किती श्रद्धाळू तिथे मरण पावले हा माझा प्रश्न होता. सरकारमुळे झालं असं मी म्हणत नाही किंवा विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे. आजही तिकडे दोन ते अडीच हजार लोक त्या दिवसापासून बेपत्ता आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

“चार दिवसांपूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून प्रेत बाहेर काढण्यात आली. नक्की मृतांचा आकडा किती आहे? लोकामध्ये चर्चा आहे, दोन ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. साधारण 1500 ते 2000 लोक मरण पावले असावेत. तिथे 30 हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही फुटेज लोकांसमोर का आणत नाही. सत्य लोकांसमोर येईल” असं संजय राऊत म्हणाले. “2 हजार लोक आजही त्या दिवसापासून बेपत्ता आहेत, त्यांचं काय झालं? याचा अर्थ 2 हजार लोक मरण पावली का? प्रेत गायब केली का? यावर सत्ताधारी बकाावरुन विरोध सुरु झाला उपसभापतींनी माझा माईक बंद केला” असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘तशी हिम्मत फडणवीस यांच्या बॉसेसनी दाखवावी’

“देवेंद्र फडणवीस इथे दिल्लीत आले, त्यांना तुम्ही विचारलात शिवसेना तटस्थ आहे. त्यांचं उत्तर होतं, शिवसेनेची चार मतही नाहीत. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, ईव्हीएममध्ये आमची मत नाहीत, बॅलेट पेपरवर मतदान घेतलं असतं, तर आमची किती मतं आहे ते कळलं असतं. ईव्हीएमची मालकी नसल्यामुळे इथल्या लोकशाहीचे मालक आम्ही नाही. त्यामुळे आमच्याकडे चार-पाचशे मत नसतील, निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची हिम्मत फडणवीस यांच्या बॉसेसनी दाखवावी, दिल्लीत, उत्तर प्रदेशमध्ये किती मत आहेत ते दाखवून देऊ” असं संजय राऊत म्हणाले.

‘ते ताक फुंकून पितायत असं मला दिसतय’

देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर कधी रहायला जाणार त्याबद्दल सांगितलं यावर संजय राऊत म्हणाले की, “मी त्यांच्या भूमिकेच स्वगात करतो. महाराष्ट्राच मंत्रिमंडळ हा वेड्यांचा बाजार आहे. अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे” “पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, मुख्यमंत्री वर्षावर का रहायला जात नाहीत?. त्यावर मी माझ्याकडची माहिती त्यांना दिली. मी सुद्धा पत्रकार आहे. लोक मला काही गोष्टी सांगतात. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर रहायला जावं, ते त्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. आमचे मुख्यमंत्री जात नाहीयत, ते ताक फुंकून पितायत असं मला दिसतय” असं संजय राऊत म्हणाले.

सागर आणि वर्षा बंगल्यामध्ये पाच पावलाच अंतर

जादूटोण्यातंर्गत तुमच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जातेय, “मी काय केलं, माझ्याकडे जी माहिती आहे, त्या संदर्भात जादूटोण्याचा काही करायचं असले, तर एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांवर करा. ते कामाख्य देवीला जाऊन रेडे कापून आले. सत्तेवर बसले. काही विषय श्रद्धेचे, काही विषय अंधश्रद्धेचे असतात. सागर आणि वर्षा बंगल्यामध्ये पाच पावलाच अंतर आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ वर्षा बंगल्यावर रहायला जावं” असं संजय राऊत म्हणाले.

अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.