Sanjay Raut : मनसेने खुर्ची रिकामी ठेवली, त्यावर खवळलेले संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंनी आधी….
Sanjay Raut : "पैशाच वाटप सर्रास सुरु आहे. जिथे पैसे पोहोचवायचे ते शिंदे, फडणवीस, अजितदादांनी पोहोचवले” असा आरोप संजय राऊत यांनी केला.कॉमन सेन्स आहे, जे पैशांच वाटप, आदान-प्रदान होतं ते उद्धव ठाकरें सारखे नेते आपल्या बॅगेतून नेणार का?" असं संजय राऊत म्हणाले.
“निवडणूक आयोगाच्या कारवाया कशा एकतर्फी आहेत, हे मागच्या तीन वर्षात आपण पाहिलं आहे. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला. कायद्याच उल्लंघन करुन शिवसेना पक्ष, चिन्ह हे बेकायदेशीरपणे फुटीरगटाच्या हाती दिलं. नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करतो” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. “निवडणूक आयोगाच्या कारवाईवर महाराष्ट्रातील जनतेला विश्वास ठेवता येत नाहीय. निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या, नेत्यांच्या बॅगा तपासणं हे चुकीच मानत नाही. पण कॉमन सेन्स आहे, जे पैशांच वाटप, आदान-प्रदान होतं ते उद्धव ठाकरें सारखे नेते आपल्या बॅगेतून नेणार का? लोकसभ निवडणुकीत एकनाथ शिंदे कशाप्रकारे बॅगा आपल्या हेलिकॉप्टरमधून नेत होते हे आम्ही दाखवलं” असं संजय राऊत म्हणाले.
विक्रोळीच्या सभेत मनसेने संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवली होती. राजकीय भाषा कशी असावी, हे ऐकण्यासाठी राऊतांनी यावं, म्हणून मनसेकडून ही खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरेंनी आधी स्वत:ची भाषणं ऐकावी, पहावी. कळेल त्यांना. त्यांनी आम्हाला भाषा शिकवू नये. खासकरुन मराठी भाषा शिकवू नये. आम्ही ज्या हेड मास्टरकडे शिकलो, त्यानंतर मराठीत असा कुणी हेड मास्टर झाला नाही, त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे” असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.
गौतम अदानींवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
“अजित पवार यांच्यानुसार आमचं सरकार उद्योगपतींनी पाडलं. गौतम अदानी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वारंवार बैठक व्हायची. सरकार पाडण्यासाठी बैठका होत होत्या. शरद पवार की अदानींनी पक्ष फोडला हे अजितदादांना विचारा” असं संजय राऊत म्हणाले. “गौतम अदानीला हे सरकार नको होतं. ही मुंबई महाराष्ट्र त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे. म्हणून मोदी-शाह यांनी आधी शिवसेना तोडली. त्यासाठी अदानीचा वापर केला, हे त्यांच्या सरकारमधले अजित पवार सांगत आहेत, यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो?” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “पैशाच वाटप सर्रास सुरु आहे. जिथे पैसे पोहोचवायचे ते शिंदे, फडणवीस, अजितदादांनी पोहोचवले” असा आरोप संजय राऊत यांनी केला.