Sanjay Raut : ‘ते राज ठाकरे असतील तर मी राऊत आहे’
Sanjay Raut : "मोदींच्या काळात कोणाीच सेफ नाही. तुम्ही आल्यामुळे आम्ही अनसेफ होतो. मोदी काहीही म्हणू शकतात. मोदींनी पंतप्रधान म्हणून बोलावं. शिवसेनेतल्या आमच्या सहकाऱ्यांना, राष्ट्रवादीच्या सहाकऱ्यांना मोदी-शाहनींच वेगळं केलय"
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्रात भाषा घाणेरडी केली अशी टीका केली होती. त्यावर आज संजय राऊत यांना नियमित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलं. “राज ठाकरे बोलतायत बोलू दे ना. भाजपाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, लूट करतायत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्याला जी भाषा समजते, त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलय” असं संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. “भाषेची शुद्धता स्वच्छ, शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी, महाराष्ट्राच्या शत्रूसाठी वापरायची. आम्ही ही चाटूगिरी, चमचेगिरी करणारे लोक नाहीत. राज ठाकरे काय बोलले, त्यात मला जायचं नाही. भाजपाच स्क्रिप्ट आहे. फडणवीसांच स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं, नाहीतर ईडीची तलवार आहेच” असं संजय राऊत म्हणाले.
“आम्ही अत्यंत सभ्य, सुस्कृंत माणसं आहोत. आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलय. माझं बरचस आयुष्य बाळासाहेबांबरोबर गेलय हे राज ठाकरेंना माहित आहे. कोणती भाषा कधी वापरायची, काय लिहायचं, काय बोलायचं, याचे मला धडे घेण्याची गरज नाही, ते राज ठाकरे असतील तर मी राऊत आहे. बाळसाहेबांनी घडवलेला राऊत आहे” असं संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. “खर म्हणजे आज महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात गुंडांच राज्य सुरु आहे, त्यावर राज ठाकरेंनी बोलावं” असं संजय राऊत म्हणाले.
‘आपण काय बोलतोय हे मोदी-शाहंनी समजून घ्यावं’
एक हैं तो सेफ हैं असं मोदी म्हणाले. त्यावर राऊत म्हणाले की, “मोदींच्या काळात कोणाीच सेफ नाही. तुम्ही आल्यामुळे आम्ही अनसेफ होतो. मोदी काहीही म्हणू शकतात. मोदींनी पंतप्रधान म्हणून बोलावं. शिवसेनेतल्या आमच्या सहकाऱ्यांना, राष्ट्रवादीच्या सहाकऱ्यांना मोदी-शाहनींच वेगळं केलय. आपण काय बोलतोय हे मोदी-शाहंनी समजून घ्यावं. आमचं शिवसेना कुटुंब तुम्हीच फोडलं”