Sanjay Raut : ‘…असं ऐकतो, तेव्हा मला राज ठाकरेंबद्दल वाईट वाटतं’ कशाबद्दल संजय राऊत बोलले?

Sanjay Raut : "राज ठाकरे यांच्या म्हणण्याला काही किंमत आहे का? नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना जे बोलायचय ते राज ठाकरे म्हणतायत" "राज ठाकरे मागची 25-30 वर्ष एकच उद्धव ठाकरे ही भूमिका घेऊन राजकारण करतायत" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : '...असं ऐकतो, तेव्हा मला राज ठाकरेंबद्दल वाईट वाटतं' कशाबद्दल संजय राऊत बोलले?
राज ठाकरे, संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 10:44 AM

राज ठाकरे यांनी काल शिवडी येथील प्रचार सभेत उद्धव ठाकरेंचा खाष्ट सासू असा उल्लेख केला. त्यावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे हे गेल्या 25 वर्षांपासून भाजपाच स्क्रिप्ट वाचत आहेत. कधी नारायण राणे, कधी एकनाथ शिंदे यांचं स्क्रिप्ट वाचतात. तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी स्वत:च शिवसेना पक्ष सोडला. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. याक्षणी अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेतोय असं दिसत नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरे हे नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंचा द्वेष करतात. बाळासाहेबांना सर्वात जास्त त्रास ज्या छगन भुजबळांनी दिला, त्यांना घरी जेवायला बोलावलं अशी टीका राज ठाकरेंनी केली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “मग, भुजबळांना तुम्ही जेवायला बोलवत नाही का? नारणय राणेंना मिठ्या मारत नाही का? एकनाथ शिंदेंना तुम्ही जेवायला बोलवत नाही का?” “आमच्यावर अत्याचार झाला नाही का? आम्ही पक्ष सोडला नाही, आम्हाला कमी त्रास झाला नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेते आहोत आणि राहणार” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

‘आमचा पक्ष पुढे गेला, बदलला’

“राज ठाकरे एका चष्म्यातून बघतात. ते स्वत:च्या नजरेतून पाहतात. राज ठाकरे यांना पक्ष सोडून 25 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. त्यानंतर आमचा पक्ष पुढे गेला, बदलला. राज ठाकरे सातत्याने निवडणुका लढतायत आणि हरतायत. 2024 ला आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह नव्हतं, तरी आम्ही लाखो मत घेऊन 9 खासदार निवडून आणले. महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे” असं संजय राऊत म्हणाले.

‘राज ठाकरे यांच्या म्हणण्याला काही किंमत आहे का?’

राजकीय चिखलाला उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “राज ठाकरे यांच्या म्हणण्याला काही किंमत आहे का? नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना जे बोलायचय ते राज ठाकरे म्हणतायत” “राज ठाकरे मागची 25-30 वर्ष एकच उद्धव ठाकरे ही भूमिका घेऊन राजकारण करतायत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला, लोक सोडून गेले. पण ते जिंकत आहेत. महाराष्ट्रातील लोकांचा आशिर्वाद पाठिशी आहे. पण राज ठाकरे तुम्हाला कोणीतरी वापरुन घेतय. तुम्हाला लोक सुपारीबाज बोलतात तेव्हा मला वाईट वाटतं” असं संजय राऊत म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.