ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप, मनसे आमदारांनी एकदा शीळ फाट्यावर फेरफटका मारावा : खा. श्रीकांत शिंदे
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाणे : “ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा, जेणेकरुन कल्याण शीळ रोडवर कुठे काम सुरु आहे हे कळेल”, असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना दिलं आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्याप्रमाणेच डोंबिवलीतही सहज फेरफटका मारावा, किमान त्यामुळे तरी कल्याण-शीळ मार्गावरचे खड्डे भरले जातील”, असं उपरोधिक आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी उत्तर दिलं.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा, म्हणजे खड्डे भरले जातील, मनसेचा टोला
“रेल्वे सेवा बंद असल्याने कल्याण शीळ रस्त्यावर वाहतुकीचा ताण आहे. वेळ मिळतोय तसा पॅचवर्क, डांबरीकरण, काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. या रस्त्याचं सहा पदरी रुंदीकरणाचं काम काम सुरु आहे. कोरोना संकट असूनसुद्धा या रस्त्याचं काम बंद पडलं नाही. त्याचबरोबर पाऊसही पडतोय. त्यामुळे खड्डे होत आहेत. मात्र खड्डे बुजवण्याचं काम सुरु असून लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल”, असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं.
राजू पाटील नेमकं काय म्हणाले होते?
“उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो,” असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे.
@OfficeofUT जी ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील,पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो .@mieknathshinde @CMOMaharashtra pic.twitter.com/FrjkFsHfTy
— Raju Patil (@rajupatilmanase) August 24, 2020
दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाण्यात रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळत आहे. काल (24 ऑगस्ट) उद्धव ठाकरेंनी ठाणे महापालिकेत आढावा बैठकींसाठी हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील काही रस्ते चकाचक करण्यात आले. मुख्यमंत्री ज्या ज्या रस्त्यावरुन जाणार आहेत, त्या सर्व रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यात आले.
विशेष म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उभं राहून रस्त्यावर राहून खड्डे बुजवून घेतले. मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरुन प्रवास करणार आहेत केवळ त्याच रस्त्यावरील खड्डे बुजवले असल्याचे बोललं जात आहे. मात्र इतर रस्त्यांकडे कोणीही अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे इतर रस्त्यांचे काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित केले जात आहे.
ठाणेकर नागरिकांचा प्रवास सुखकर व खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टीने खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून नितीन कंपनी फ्लायओव्हर येथे सुरू असलेल्या कामांची व्यक्तीशः हजर राहून पाहणी केली. pic.twitter.com/7YKIkWt0Ge
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 23, 2020
हेही वाचा :
दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न, पण गाफिल राहू नका, ठाणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबईत आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात, निदान लवकर करणं शक्य