राज्यात स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार; सुजय विखेंची टीका, पवार, लंकेंनाही लगावला टोला

सध्या अहमदनगर जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. खासदार सुजय विखे यांनी आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केलीये. तसेच त्यांनी माहाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

राज्यात स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार; सुजय विखेंची टीका, पवार, लंकेंनाही लगावला टोला
आमदार निलेश लंके, खासदार सुजय विखे पाटील
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 7:48 AM

अहमदनगर : सध्या जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. खासदार सुजय विखे यांनी आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केलीये. तसेच त्यांनी माहाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोनही नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

राऊत राष्ट्रवादीत गेल्याने फरक पडत नाही

ते पुढे बोलताना म्हणाले की, मागच्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारची कामगिरी जनता पाहात आहे. दोन वर्षांतील ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे भाजपाला पारनेर आणि कर्जत अशा दोनही मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे. कर्जतचे माजी  नगराध्यक्ष नामदेव राऊत राष्ट्रवादीत गेल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. आमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र विरोधकांचा अजून उमेदवारच ठरला नाही. रोहित पवार आणि निलेश लंके यांच्याबद्दल जर जनतेला विश्वास वाटत असेल तर त्यांच्या उमेदवाराला निवडून द्यावे. मात्र त्यामुळे भविष्यात पश्चताप करण्याची वेळ येऊ शकते अशी टीका त्यांनी यावेळी केली.

सरकारवर ढोंगीपणाचा आरोप

विखे यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष नगर पंचायत निवडणुकीमध्ये एकत्र येणार नाहीत. मात्र निवडणूक झाल्यावर एकत्र येतील जनतेने यांचा ढोंगीपणा लक्षात घ्यावा. हे सरकारच मुळात स्वार्थासाठी एकत्र आले आहे. ते आपसात भांडत असून, मुळ मुद्द्यापासून दूर पळतात. राज्यात वीजबिल, कोरोना, शेतकरी अनुदान असे अनेक प्रश्न आहेत. मात्र यातील एकही प्रश्न राज्य सरकारला मार्गी लावता आला नसल्याची देखील टिका त्यांनी यावेळी केली.

पवार, लंकेंच्या मंत्रीपदाच्या चर्चेवरून टीका

आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. यावरून देखील वीखे यांनी टीका केलीये. जिल्ह्यात दोन नाही तर  सहा मंत्रीपदे देऊन अहमदनगर जिल्ह्याला राज्याची राजधानी घोषित करावी असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गरज पडली तर नगरमध्ये एखादे मंत्रालय देखील बांधता येईल, असा खोचक टोला विखे यांनी लगावला.

संबंधित बातम्या

महाविकास आघाडीकडून ओबीसींची फसवणूक, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, चंद्रकांतदादांचा इशारा

संविधान वाचवणे हीच महामानवास खरी आदरांजली, नाना पटोले यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Obc reservation : सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, चंद्रकांत पाटलांचा आरोप

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.