Supriya Sule : ‘मी संसदेत बोलल्यावर माझ्या नवऱ्याला….’ सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान
Supriya Sule : मराठा आरक्षणाच्या विषयावर खासदार सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. आज त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे खासदार अमोल कोल्हे सोबत होते. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत मुद्दा बनला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका या मुद्यावर लढवल्या जाणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. “आम्ही पारदर्शकपणे काम केलय. मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत, भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची सहकार्याची तयारी आहे. मी, अमोल 10 वर्ष खासदार आहोत. आम्ही ससंदेत बोललो आहोत. संविधानिक दुरुस्ती करावी लागेल. महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे. आम्ही या बाबतीत चर्चा करायला तयार आहोत. प्रस्ताव ताकदीने सरकारने मांडावा. आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“त्यावेळी मोदी सरकार होतं. आज एनडीए सरकार आहे. आमची सहकार्याची भूमिका राहील. समाजात प्रचंड अस्वस्थतता आहे. ते वाढवण्याच काम महाराष्ट्रातील निष्क्रिय ट्रिपल इंजिन खोके सरकार करत आहे. त्यांच्या निर्णयात सातत्य नाहीय” अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
आमच्या 70 वर्षांचा हिशोब काढता, आम्ही कधी….
कायद्यामध्ये दुरुस्तीचा प्रश्न आहे. त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सर्वात जास्त संसदेत मी बोलले आहे. मी आमच्या संघटनेबद्दल जबाबदार आहे. आम्ही दडपशाही केलेली नाही. विरोधात बोललो म्हणून इन्कम टॅक्स नोटीस काढलेली नाही. आमच्या 70 वर्षांचा हिशोब काढता, आम्ही कधी असं गलिच्छ राजकारण केलेलं नाही. सत्तेत आल्यावर करणारही नाही”
‘आम्ही लव्ह लेटर बोलतो’
संसदेत तुम्ही प्रश्न मांडल्यावर आयकर खात्याकडून तुमच्या पतींना नोटीस येते, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “कालच नोटीस आली. आज बोलल्यामुळे पुन्हा येईल. आम्ही त्याला नोटीस नाही, लव्ह लेटर बोलतो” केंद्रातले नेते महाराष्ट्रात येऊन आरक्षणावर बोलत नाहीत. राज ठाकरे आरक्षणाची गरज नाही बोलतात, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे’