AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Exam new Dates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा,परीक्षा 8 दिवसात, उद्याच तारीख जाहीर होणार

MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख उद्याच जाहीर होईल आणि परीक्षा येत्या 8 दिवसांच्या आतच होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख उद्या जाहीर होणार हे आता स्पष्ट झालं आहे.

MPSC Exam new Dates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा,परीक्षा 8 दिवसात, उद्याच तारीख जाहीर होणार
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 8:57 PM

मुंबई : MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभरात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमारही केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख उद्याच जाहीर होईल आणि परीक्षा येत्या 8 दिवसांच्या आतच होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख उद्या जाहीर होणार हे आता स्पष्ट झालं आहे.(Uddhav Thackeray has clarified that MPSC will announce the date of pre-examination on Friday)

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

मी नेहमी रविवारी बोलतो. आज जे वातावरण तयार करण्याच्या प्रयत्न झाला त्यावर मी बोलणार आहे. त्यानंतर साहजिकच कोरोनार बोलणार आहे. गेल्यावर्षी दिवाळीआधी या परीक्षांची तारीख जाहीर झाली होती. नंतर आपण ती पुढे ढकलली. ती पुढे ढकलल्यानंतर सांगितलं होतं, या पुढे जी तारीख जाहीर होईल तेव्हा ती कोणत्याही कारणाने पुढे ढकलली जाणार नाही. तशी ती तारीख या 14 मार्चला जाहीर झाली. आता परत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

‘कुणी भडकवतोय म्हणून भडकू नका’

विद्यार्थी अनेक दिवसांपासून परिश्रम करुन अभ्यास करत आहेत. ही परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. मी स्वत: मुख्य सचिवांना आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. परीक्षेची तारीख पुढच्या आठ दिवसातीलच असणार आहे. उगाच कोणी भडकवतोय म्हणून भडकून जाऊ नका. आपला अभ्यास सुरु ठेवा. मी तुम्हाला वचन देतो की, येत्या आठवड्याभरात परीक्षा होईल.

‘परीक्षा पुढे ढकलण्यामागे कोरोना हेच कारण’

‘उद्याची परीक्षा पुढे ढकलण्यामागे कोरोनाचा हेच कारण आहे. आपल्याला कल्पना असेल या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. विद्यार्थ्यांची सोय करण्यापासून पेपर गोळा करुन गठ्ठे बांधने हे काम असतं. त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाचं आहे. ज्यांना लस दिली गेली तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नाही तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत’, अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

‘विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळायचं नाही’

परीक्षाचं एखादं केंद्र प्रतिबंधात्मक क्षेत्रात असेल तर आपला प्लान बी काय असेल, आपण परीक्षा कुठे घेऊ शकतो याबाबत निर्णय घेणं जरुरीचं आहे. बंदिस्त खोलीत जास्त वेळ राहणं धोकादायक आहे. मला कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भावनांशी आणि आरोग्याशी खेळायचं नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी निरोगी असले पाहिजेत. या सर्व गोष्टींची खबरदारी घेऊन पुढच्या आठवड्यात परीक्षा होणार, असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

काही जणांची अडचण वेगळी आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला परवानगी दिली आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादाची अट येणार नाही. आपली थोडीसी गैरसोय झालीय याबाबत मी दिलगीरी व्यक्त करतो. हा चार-पाच दिवसांचा काळ लागतोय तो केवळ आपल्या पाल्याच्या आरोग्यासाठी लागत असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या :

MPSC Exam : सरकार श्रीमंत मराठ्यांना बळी पडतंय, उद्धव ठाकरे कणा दाखवा : प्रकाश आंबेडकर

EXCLUSIVE : पळपुटेपणा नको, मुलांचं वय वाया गेलं, संधी हुकली तर जबाबदार कोण, MPSC परीक्षा आताच घ्या : देवेंद्र फडणवीस

Uddhav Thackeray has clarified that MPSC will announce the date of pre-examination on Friday

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक.
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं...
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं....
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.