Breaking News : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप; अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Breaking News : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप; अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 3:48 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी…  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतरही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे आणि आदिती तटकरे या नेत्यांनी शपथ घेतली आहे.

चार वर्षात तीन वेळा मुख्यमंत्रिपद

2019 पासून राज्याच्या राजकारणात सातत्याने बदल होत आहेत. 2019 पासून राज्यात तीन सरकार सत्तेत आले. यातील तीनही सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. 2019 ला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात सरकार स्थापन झालं. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण काहीच दिवसात अजित पवार यांचं बंड मोडीत निघालं. नंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्येदेखील अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामील झाले आहेत.

शरद पवार यांचा पाठिंबा नाही?

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते पाहता शरद पवार यांचा या शपथविधीला पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. मात्र संजय राऊत यांनी ट्विट करत शरद पवार यांचा या घडामोडींना पाठिंबा नसल्याचं सांगितलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले” मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.”. होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.