AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘समीर वानखेडेंना एकाकी पडू देऊ नका, मविआतील नेत्यांच्या घोटाळ्यावरुनही लक्ष हटायला नको’, भाजप नेत्यांना दिल्लीतून आदेश?

महाविकास आघाडी सरकार असलेल्या राज्यात समीर वानखेडे यांना एकाकी पडू देऊ नका, असा आदेशच दिल्लीतील भाजप नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्याचं कळतंय. त्याबाबत व्यूहरचना तयार करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या घरी बैठका सुरु असल्याची माहिती मिळतेय. तसंच भाजपचे अनेक नेते सध्या वरळीत एक ठिकाणी असल्याचं कळतंय.

'समीर वानखेडेंना एकाकी पडू देऊ नका, मविआतील नेत्यांच्या घोटाळ्यावरुनही लक्ष हटायला नको', भाजप नेत्यांना दिल्लीतून आदेश?
समीर वानखेडे, एनसीबी अधिकारी
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 1:56 PM

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. रोज पत्रकार परिषद घेत मलिकांनी वानखेडेंवर आरोपांची मालिकाच सुरु ठेवलीय. महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांकडूनही मलिकांच्या आरोपांना दुजोरा दिला जात असल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी समीर वानखेडे आणि त्यांचं कुटुंब एकाकी पडल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून राज्यातील भाजप नेत्यांना महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मिळतेय. (Maharashtra BJP leaders have received orders from central leaders to support Sameer Wankhede)

महाविकास आघाडी सरकार असलेल्या राज्यात समीर वानखेडे यांना एकाकी पडू देऊ नका, असा आदेशच दिल्लीतील भाजप नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्याचं कळतंय. त्याबाबत व्यूहरचना तयार करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या घरी बैठका सुरु असल्याची माहिती मिळतेय. तसंच भाजपचे अनेक नेते सध्या वरळीत एक ठिकाणी असल्याचं कळतंय. पडद्यामागे राहून वानखेडेंना हवी ती मदत करा, सहकार्य देण्याची भूमिका घ्या, असा आदेश दिल्लीतील भाजप नेत्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुंबईत दाखल झाल्याचंही समजतं. त्याचबरोबर वानखेडेंना मदत करताना मविआतील नेत्यांवरील घोटाळ्यांच्या आरोपातून लोकांचं लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्लीतून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं दुर्दैवी – फडणवीस

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावर आधारित आरोप करणं हे दुर्दैवी आहे. शेवटी वानखेडे यांच्या पत्नीला खुलासा करावा लागला. वानखेडे यांनीही आपल्या प्रमाणपत्राबाबत खुलासा केलाटय. त्यामुळे विशिष्ट हेतूने आरोप करणं योग्य नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी मलिकांच्या आरोपांवर टीका केलीय.

नवाब मलिक यांचे दुःख वेगळे आहे. ते स्पष्टपणे समोर येत आहे आहे. तपास अधिकाऱ्यांना टार्गेट करणे हे योग्य नाही. कारण, ते घटनात्मक पदावर आहेत. घटनात्मक पदावरचा माणूस सांगेल की मी याला जेलमध्ये टाकणार, कारवाई करणार, सर्टिफिकेट खोटे आहे. परत आपल्या सरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात आणायचे. हे जे सुरू आहे ते बरोबर नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायालयाबाहेर समाप्त करण्याची पद्धत सुरु झाली तर कुठलीच केस टिकणार नाही. त्यासाठी शासकीय यंत्रणांचा वापर झाला तर तेही चूक असेल. पण एक गोष्ट निश्चित की या प्रकरणात काही आरोप निश्चित झालेत. एनसीबीतील वरिष्ठांनी त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. पण त्याच वेळी तपास अधिकाऱ्यांना धमकावणे हे योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

त्यांना लाज वाटायला हवी, किरीट सोमय्यांचा घणाघात

समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. एका अधिकाऱ्याची जात काढली जाते, त्याचा बायकोची इज्जत काढली जाते, अशा शब्दात सोमय्या यांनी ठाकरे आणि पवारांवर निशाणा साधलाय. तसंच महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे दाबण्यासाठीच समीर वानखेडे प्रकरणाची चर्चा सुरु आहे. गेली 12 दिवस झाले समीर वानखेडे दलित की मुस्लिम हा वाद सुरु आहे. अजित पवारांवर 11 दिवस धाडी सुरु होत्या. त्यांना वाचवण्यासाठीच हे प्रकरण सुरु करण्यात आलं. ही सगळी ठाकरे सरकारची बदमाशी सुरु आहे. शरद पवार यांनी स्पष्ट केलं की अजित पवारांकडे चिल्लर सापडली. पण बिल्डरकडे 180 कोटी सापडले, त्याच बिल्डरने अजित पवारांना 100 कोटी रुपये दिले आहेत. अजित पवारांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. अजित पवार सिंचन घोटाळ्यात आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आहे. त्यावरील कारवाई या सरकारने थांबवली आहे, अशी टीका सोमय्या यांनी केलीय.

इतर बातम्या :

आरोपांच्या मालिकेनंतर एनसीबीची कारवाई थंडावली! तक्रारी आल्यानंतर कारवाया थांबवण्याचे वरिष्ठांचे आदेश

उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या इशाराऱ्यावर नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंची बदनामी, सोमय्यांचा थेट आरोप

Maharashtra BJP leaders have received orders from central leaders to support Sameer Wankhede

'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.