रोहित पवार यांचं भरपावसात उपोषण; म्हणाले, आता ‘हे’ काम झालं नाही तर…

Karjat Jamkhed MLA Rohit Pawar Request to Ajit Pawar : अजितदादा पवार, आपण लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा माझा मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील!; रोहित पवार यांची मागणी

रोहित पवार यांचं भरपावसात उपोषण; म्हणाले, आता 'हे' काम झालं नाही तर...
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 12:37 PM

मुंबई | 24 जुलै 2023 : विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय. पण या अधिविशेन काळात कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या एका कृतीने लक्ष वेधलं आहे. रोहित पवार विधिमंडळ आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक विनंतीही केली आहे.

कर्जत जामखेडमधील युवकांचा रोजगार आणि स्थानिकांचे प्रश्न यासंदर्भात उपोषण केलं आहे. कर्जत जामखेडमध्ये MIDC येणार आहे. मात्र आता तो प्रकल्प रोखण्यात आला आहे. पण आता MIDC ला मंजुरी मिळालीच पाहिजे. कर्जत जामखेडच्या तरूणांना रोजगार मिळालाच पाहिजे. कर्जत जामखेडच्या युवांवर आणि स्थानिक जनतेवर एमआयडीसीची मंजुरी रोखून अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध, असा फलक या उपोषणावेळी रोहित पवार यांच्याजवळ होता.

याचवेळी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितच पवार यांच्याकडे एक मागणी केली आहे. अजितदादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील!, असं रोहित पवार म्हणालेत.

माझ्या मतदारसंघातील MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार!, असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवारांकडे मागणी

याचवेळी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एक मागणी केली आहे. अजितदादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील!, असं रोहित पवार म्हणालेत.

आंदोलन मागे पण…

मी उपोषणाला बसलेलो असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते मला भेटायला आले. तसंच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील तिथं आले. त्यांनी मला शब्द दिला आहे. कर्जत-जामखेडच्या अधिसुचनेच्या बाबतीतील बैठक उद्या तातडीने घेतली जाईल. अधिवेशन संपण्याच्या आधी अधिसुचना काढली जाणार आहे. पुढच्या काहीच दिवसात एमआयडीसीच्या बाबतीतील जी प्रक्रिया आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार, असा शब्द सामंतजींनी दिला आहे, असं रोहित पवार म्हणाले.

युवकांसाठी करत असलेलं आंदोलन मी मागे घेत आहे. उद्या बैठक आहे. लवकरच अधिसूचना निघेल आणि एमआयडीसीचं काम होईल, असा विश्वास वाटतो. पण जर तसं झालं नाही तर माझ्या मतदारसंघातील हजारो युवक मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील, असं रोहित पवार म्हणाले.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.