मुंबई : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, या मागणीसाठी भाजपनं आज मुंबईत जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. दुसरीकडे कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात रेलभरो आंदोलन करण्यात आलं. मुंबईतील चाकरमान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेल्या सर्वांना प्रवास करण्यास परवानगी मिळावी या मागमीसाठी, तसंच ठाकरे सरकारच्या वेळकाढू भूमिकेविरोधात भातखळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन मोडित काढलं आणि भातखळकर यांच्यासह 50 ते 60 भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली. (Atul Bhatkhalkar’s agitation for travel in Mumbai local)
हॉटेल, बार, दारूची दुकाने सुरू करणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यास वाटाण्याच्या अक्षता लावत आहे. उच्च न्यायालयाने सुद्धा दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची सूचना केलेली असताना व रेल्वे मंत्रालयाने सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची तयारी दाखवलेली असताना सुद्धा घरबश्या ठाकरे सरकारकडून मात्र नकार दिला जात आहे. पत्रकार, वकील यांना सुद्धा लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा 24 तासाच्या आत राज्य सरकारने लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अन्यथा लहरी, तानाशाही व तुघलकी ठाकरे सरकारच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिलाय.
लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार. लोकांची परवड करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो… pic.twitter.com/gwQfIWRKzR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 6, 2021
दुसरीकडे चर्चगेट आणि चर्नी रोड परिसरात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात रेलभरो आंदोलन करण्यात आलं. बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. मग रेल्वेतून प्रवास का करू दिला जात नाही?, सर्वसामान्यांनी काय घोडं मारलं? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी दरेकर यांना रेल्वेकडून 260 रुपयांचा दंड आकारण्यात आला.
भाजपचे नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात ही आंदोलने करण्यात आली. यावेळी आमदार मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. तर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आमदार राहुल नार्वेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर, कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेकडो भाजप कार्यकर्ते जमले होते. यावेळी आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सर्व सामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
भाजपाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारने करू नये, जनतेचा हा उद्रेक रोखण्याची ताकद या सरकारमध्ये नाही. pic.twitter.com/o9C3NyO5hl
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 6, 2021
संबंधित बातम्या :
लोकल सुरु करा, अन्यथा 15 हजार रुपये भत्ता द्या, ईएमआय बंद करा; रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी
Atul Bhatkhalkar’s agitation for travel in Mumbai local