कोण अमृता फडणवीस? ‘नावडतीचं मिठ अळणी’ अशी त्यांची अवस्था! किशोरी पेडणेकरांचा जोरदार टोला

कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय.

कोण अमृता फडणवीस? 'नावडतीचं मिठ अळणी' अशी त्यांची अवस्था! किशोरी पेडणेकरांचा जोरदार टोला
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 3:58 PM

मुंबई : राज्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या शहरात सरकारनं निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारनं पुण्यातील निर्बंध जैसे थेच ठेवले आहेत. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. पुण्यात सरकारनं असा निर्णय का घेतला कळत नाही. कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही फडणवीस यांनी पुणेकरांना दिलाय. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पुणे मेट्रोच्या ट्रायलवरुनही अमृता फडणवीस यांनी टोला लगावलाय. त्यांच्या या टीकेला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Kishori Pednekar criticizes Devendra Fadnavis’s wife Amrita Fadnavis)

कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय. तसंच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं सांगत त्यांनी हा विषय टाळलाय. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चांगलं काम करत आहे. पण त्यांना दिलेलं काम योग्य पद्धतीनं केलं पाहिजे, अशंही पेडणेकर म्हणाल्या. लोकल सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे. पत्रकार हा कोरोना संकटाच्या काळात पुढे राहून काम करत होते. त्यामुळे त्यांना रेल्वे प्रवास मिळायला हवा, असं मतही पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केलंय.

पुणे मेट्रोवरुन अमृता फडणवीस यांची टीका

दुसरीकडे पुणे मेट्रोच्या प्रोजेक्टवरुनही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य शासनावर निशाणा साधला.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

“हॅन्डलूम जगभरात आहे. हॅन्डलूम 125 देशात एक्स्पोर्ट होतं. शेती नंतर हातमाग हा सर्वात मोठा उद्योग आहे. 77 टक्के या कामात स्त्रिया आहेत. 7 ऑगस्ट 2015 पासून हातमागदिन साजरा केला जातो.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमागाचं महत्व ओळखले आहे. स्वदेशी चळवळ 7 ऑगस्टला सुरु झाली होती. त्याचमुळे 7 ऑगस्ट ला हातमागदिन साजरा केला जातो. पैठणीचं कारोबारही मोठा आहे. देशातले स्त्रिया पैठणी ऐटीने घालतात. हॅन्डलूमचं क्षेत्रही चांगलं वाढत आहे. हँडलूमच्या वस्तू फक्त जपून ठेवायच्या नाहीत त्या वापऱ्यायच्या.”, असं उद्घाटन कार्यक्रमानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

पुणेकरांच्या नाराजीची राज्य सरकारकडून दखल, आरोग्यमंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये चर्चा

कोणी लाडका नाही, कोणी दुश्मन नाही, व्यापाऱ्यांनो, संयम सोडू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Kishori Pednekar criticizes Devendra Fadnavis’s wife Amrita Fadnavis

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.