अजितदादांच्या सभेसाठी ‘त्या’ मंत्र्याने सत्तेचा पुरेपुर वापर केला, पण…; रोहित पवार यांचा उत्तरसभेवर निशाणा

Rohit Pawar on Ajit Pawar Group : अजितदादा पवारांच्या सभेसाठी 'त्या' मंत्र्याने सत्तेचा पुरेपुर वापर केला, भाजपाचे गोडवे गायले की... बीडच्या सभेत बारामतीच्या सभेची प्रचिती!; रोहित पवार यांचा अजित पवार गटावर घणाघात

अजितदादांच्या सभेसाठी 'त्या' मंत्र्याने सत्तेचा पुरेपुर वापर केला, पण...; रोहित पवार यांचा उत्तरसभेवर निशाणा
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 3:32 PM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी अजित पवार गटाची काल बीडमध्ये सभा झाली. या सभेत अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी धडाकेबाज भाषणं केली. या सभेवर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. या सभेची तुलना त्यांनी अजित पवारांच्या बारामतील सभेशी केली आहे. ट्विट करत रोहित पवार यांनी निशाणा साधला. अजित पवार यांच्या बीडमधील सभेसाठी एका मंत्र्याने सत्तेचा पुरेपुर वापर केला. पण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं, असं रोहित पवार म्हणाले.

काल सभेला गर्दी झाली पण जेव्हा पवार शरद पवारसाहेबांबद्दल वक्तव्य झाली. तेव्हा लोक तिथून निघू जाताना पाहायला मिळालं, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार यांचं ट्विट जसंच्या तसं

बीडमध्ये मोठं स्वागत झालं पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेंव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं. बाकी संपूर्ण सभेत जेंव्हा भाजपाची आरती गायली गेली तेंव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या, यातच सर्व आलं…. कारण बारामती असो किंवा बीड… संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीसाठी आज गुजरातला गेले आहेत. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजची परिस्थिती वेगळी झाली आहे. आधी महाराष्ट्रात नेते यायचे आदर्श घ्यायला. आज आपले मुख्यमंत्री गुजरातला गेले आहेत. महाराष्ट्र बघत आहे. राजकारण न करता आपण माणुसकीच्या हिताने पहिलं पाहिजे. गुजरातचे दोन विषय आहे. डायमंड मार्किट आणि आयएफएससी मार्केट. या संदर्भात जाऊन बघून यावं आणि चर्चा करावी, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. याबाबतही रोहित पवार यांनी माहिती दिली. या भेटीत कोणतीही राजकीय इतर चर्चा झालेली नाही. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांना काळजी घ्यायला सांगितलं, असं रोहित पवार म्हणाले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.