BMC Election 2022 kalina (Ward 90): कोण बाजी मारणार? काँग्रेस नंबर वन राहणार की समाजवादी भारी ठरणार? कलिना वॉर्डात अंदाज बांधणं कठीण

पहिला उमेदवार म्हणजेच जिंकलेला उमेदवार काँग्रेस पक्षाचा आणि दुसरा आलेला समाजवादी पक्षाचा होता. 2017 च्या निवडणुकीत या दोघांमधील मतांचं अंतर तसं कमीच होतं त्यामुळे यावेळी समाजवादी पार्टी काय करेल याकडे लक्ष आहे.

BMC Election 2022 kalina (Ward 90): कोण बाजी मारणार? काँग्रेस नंबर वन राहणार की समाजवादी भारी ठरणार? कलिना वॉर्डात अंदाज बांधणं कठीण
BMC Ward 90Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 7:49 PM

मुंबई: वॉर्ड क्रमांक 90 म्हणजेच कालिना वॉर्ड! या वॉर्डात काँग्रेसच्या ट्युलिप ब्राईन मिरांडा यांचा 5,952 मतं मिळवून विजय झाला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे (BMC Election 2022) सगळ्याच राजकीय पक्षांचं आणि’नागरिकांचं लक्ष लागून आहे. या वॉर्डात 2017 सालच्या निवडणुकीत एकूण 20,036 वैध मतं होती. या एकूण मतांपैकी जिंकलेल्या उमेदवाराला 5,952 तर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला 4,373 मतं मिळाली होती. पहिला उमेदवार म्हणजेच जिंकलेला उमेदवार काँग्रेस पक्षाचा आणि दुसरा आलेला समाजवादी पक्षाचा होता. 2017 च्या निवडणुकीत या दोघांमधील मतांचं अंतर तसं कमीच होतं त्यामुळे यावेळी समाजवादी पार्टी (Samajwadi Party) काय करेल याकडे लक्ष आहे. त्याचबरोबर काँग्रेसला (Congress) आपल्याकडे जास्तीत जास्त मतं घेता येतायत का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मिळालेल्या मतांमध्ये फारसा फरक नसल्याने कोण कोणावर भारी ठरू शकतं याचा अंदाज बांधणं कठीण आहे. यावर्षी उमेदवारांची खरी कसोटी असणार आहे.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

वॉर्ड क्रमांक 90, कलिना या वॉर्डात नेमक्या कुठल्या ठिकाणांचा समावेश होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. या वॉर्ड मध्ये कलिना, पी&टी कॉलनी, कोरवे नगर, आय.ए.स्टाफ क्वार्टर्स या ठिकाणांचा समावेश होतो.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाआजरेकर प्रतिमा कल्पेश -
भाजपथोरात शैला कृष्णा-
राष्ट्रवादी काँग्रेस--
काँग्रेसट्युलिप ब्राईन मिरांडा ट्युलिप ब्राईन मिरांडा
मनसेश्रीमती माया जान्नाप्पा कुंचिकोरवे-
अपक्ष / इतरडॉ. सुजाता माळी (पारकर), गावंडे सेजल हृषिकेश, बेनीडीक्ट डेनिस किणी -

2017 च्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना मिळालेली वैध मते

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 5952

हे सुद्धा वाचा

समाजवादी पार्टी- 4373

भारतीय जनता पार्टी- 3818

शिवसेना- 2784

महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 2496

अपक्ष- 140

अपक्ष – 43

2017 च्या निवडणुकीत नेमकं काय चित्रं होतं?

2017च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण वैध मतांची संख्या 20,036 इतकी होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, भारतीय जनता पार्टी,शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि 2 अपक्ष उमेदवार निवडणुकीत उभे होते. एकूण सात पैकी पहिले पाच उमेदवार काहीच फरकांनी मागे पुढे होते. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीची रंगत वेगळीच असणार आहे. डॉ. सुजाता माळी (पारकर) आणि गावंडे सेजल हृषिकेश असे फोन अपक्ष उमेदवार 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीत उभे होते. त्यातल्या डॉ. सुजाता माळी (पारकर) यांनीच 140 मतं आणि गावंडे सेजल हृषिकेश यांना 43 मतं मिळाली होती. उरलेल्या पाच उमेदवारांमध्ये मिळालेल्या मतांच्या आकड्यात फार मोठा गॅप नव्हता. त्यामुळे मागच्या निवडणुकीवरून यावर्षी कोण जिंकू शकतं याचा अंदाज लावणं कठीण आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.