मुंबई : राज्यातील (State) महापालिका निवडणुकांची रंगत वाढती आहे. दुसरीकडे मुंबई (Mumbai) महापालिकेतही राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक होणार आहे. यामुळे सगळेकडे आता निवडणुकीचा माहोल आहे. अनेकांचे वॉर्ड आरक्षित झाले तर काहींचे वॉर्ड कायम राहिले आहेत. ज्यांचे वॉर्ड आरक्षित (ward reservation) झाले त्यांना दुसऱ्या वॉर्डाची शोधाशोध करावी लागत आहे. तर ज्यांचे वॉर्ड सुरक्षित राहिले त्यांच्यावर निवडणुकीत वॉर्ड राखण्याचं धर्मसंकट ओढवलं आहे. कारण मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याची काहीच शाश्वती नाहीये. त्यामुळे सर्वच पक्षाचे नगरसेवक कामाला लागेल आहेत. 2017 मध्ये वार्ड क्रमांक 220 मध्ये भाजपचे अतुल हसमुखलाल शाह विजयी झाले होते. आता यंदा काय होतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे.
2017मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावर नजर टाकल्यास वार्ड क्रमांक 220 मधून भाजपचे अतुल हसमुखलाल शाह विजय झाले होते. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रसे व राष्ट्रवादीही स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत मनसेही उतरली होती. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, या सर्वांवर मात करत अतुल हसमुखलाल शाह यांनी विजय मिळवला होता.
पक्ष उमेदवार (Candidate) विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर
बागलकर सुरेंद्र रामकृष्ण (शिवेसना) -5946
बुटवाला झोएब अहमदअली (अपक्ष) – 789
इलेक्ट्र्रीकवाला हुझैफा ईस्माईल (समाजवादी पक्ष) – 923
खांडके रुपेश महेंद्र (राष्ट्रवादी)- 971
केशव रमेश मुळे (मनसे)- 752
शाह अतुल हसमुखलाल (भाजप)- 5946
नरेश हरखचंदजी शेठ (काँग्रेस) – 5358
वैध मते -22389
वार्ड क्रमांक 220मध्ये कामठी पुरा, गुलाल वाडी, नल बाजार आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे.