मुंबई: महापालिका निवडणुकीचे (bmc) पडघम वाजू लागले आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये महापालिका निवडणूक होणार आहे. त्यासाठीची आरक्षणाची लॉटरीही फुटली आहे. त्यात अनेकांचे वॉर्ड आरक्षित झाले तर काहींचे वॉर्ड कायम राहिले आहेत. ज्यांचे वॉर्ड आरक्षित (ward reservation) झाले त्यांना दुसऱ्या वॉर्डाची शोधाशोध करावी लागत आहे. तर ज्यांचे वॉर्ड सुरक्षित राहिले त्यांच्यावर निवडणुकीत वॉर्ड राखण्याचं धर्मसंकट ओढवलं आहे. कारण मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे सर्वच पक्षाचे नगरसेवक कामाला लागेल आहेत. भाजपचे 2017 मधील वॉर्ड क्रमांक 15 चे उमदेवार प्रवीण शहाही (pravin shah)कामाला लागले आहेत. मात्र, परिसीमनामुळे त्यांचा वॉर्ड क्रमांक 15 हा वॉर्ड क्रमांक 12, 16 आणि 18 मध्ये विखुरला गेला आहे. तसेच आधीचा वॉर्ड क्रमांक 15 हा बोरीवली पश्चिममध्ये येत होता. नव्या परिसीमनामुळे झालेल्या बदलानुसार वॉर्ड क्रमांक 15 बोरीवली पूर्वेला गेला आहे. त्यामुळे शहा आता कोणत्या वॉर्डातून उभे राहणार हे पाहावं लागणार आहे.
2017मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रसे व राष्ट्रवादीही स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत मनसेही उतरली होती. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, या सर्वांवर मात करत प्रवीण शहा यांनी विजय मिळवला होता.
या निवडणुकीत शहा यांच्या विरोधात शिवसेनेचे परेश सोनी, काँग्रेसचे मेहुल घोसालिया आणि मनसेचे महेश भोईर उभे होते. मात्र, शहा यांनी अचूक नियोजन आणि आक्रमक प्रचार करून विजय मिळवला होता.
मुंबई महापालिका वॉर्ड क्रमांक 15 : mumbai municipal corporation ward 15
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | परेश धानक | - |
भाजप | प्रवीण शहा | प्रवीण शहा |
काँग्रेस | मेहुल गोसालिया | - |
राष्ट्रवादी | - | - |
मनसे | महेश भोईर | - |
इतर/ अपक्ष | अभिजीत महाडिक | - |
>> प्रवीण शहा (भाजप)- 22860
>> महेश भोईर (मनसे-) 939
>> परेश धानक (शिवसेना)- 3304
>> मेहुल गोसालिया (काँग्रेस)- 2711
>> अभिजीत महाडिक (अपक्ष)- 212
>> नारायण मिश्रा (बसपा) – 217
>> नायगम बालगणपती (अपक्ष)- 65
>> नोटा- 869
>> शहा यांचं मताधिक्य- 19556
2017मध्ये या वॉर्डात राजेंद्र नगर, मागाठाणे, पश्चिम रेल्वे लाईन, ठाकूर व्हिलेज रोड, दत्तापाडा, नॅशनल पार्क आदी नगरांचा समावेश होता. या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये झोपडपट्ट्या अधिक होत्या. परंतु 2022च्या परिसीमनानुसार या वॉर्डातील अनेक विभाग दुसऱ्या वॉर्डात गेले आहेत. तर दुसऱ्या वॉर्डातील काही विभाग या वॉर्डात आले आहेत. वॉर्ड क्रमांक 15 आता नव्या परिसीमनामुळे वॉर्ड क्रमांक 12, 16 आणि 18 मध्ये विभागला गेला आहे. तर वॉर्ड क्रमांक 14चा काही भाग या वॉर्डात आला आहे. 2017मध्ये हा वॉर्ड पूर्णपणे बोरीवली पश्चिममध्ये येत होता. आता नव्या परिसीमनामुळे वॉर्ड क्रमांक 15 हा बोरीवली पश्चिमेमध्ये येत आहे. त्यामुळे शहा यांना वॉर्ड क्रमांक 12, 16 आणि 18 या तीन वॉर्डांपैकी एका वॉर्डातून उभं राहावं लागणार आहे. अर्थात हा निर्णय शहा आणि त्यांच्या पक्षाने घ्यायचा आहे.
पूर्वी या वॉर्डाची एकूण लोकसंख्या 47 हजार 236 होती. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 3 हजार 32 होती. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 740 होती. 2022मध्ये नवीन परिसीमन झालं आहे. त्यामुळे वॉर्डाची सीमा बदलली आहे. त्यामुळे वॉर्डातील लोकसंख्याही बदलली आहे. या वॉर्ड तीन वॉर्डात विभागला गेल्याने या वॉर्डाची लोकसंख्याही बदलली आहे.
नवीन परिसीमन झालेल्या या वॉर्ड क्रमांक 15ची महापालिका प्रशासनाने 2022च्या पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढली. त्यात हा वॉर्ड खुल्या वर्गासाठीच ओपन झाला आहे. त्यामुळे शहा या वॉर्डातून निवडणूक लढवणार की ज्या वॉर्डात पूर्वीचा वॉर्ड विखुरला गेलाय तिथून निवडणूक लढणार हे आता पहावे लागणार आहे.
2017मध्ये वॉर्ड क्रमाकं 14मधून भाजपच्या असावरी पाटील विजयी झाल्या होत्या. आता हा वॉर्ड 15 नंबरचा झाला असून तो खुला आहे. त्यामुळे असावरी पाटील नव्या परिसीमनातील वॉर्ड क्रमांक 15 मधूनच निवडणुकीला उभ्या राहण्याची शक्यता अधिक आहे.