BMC Election 2022 Shankarwadi Ward 81 : दैव देते अन्… मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 81वरच सर्वांच्या नजरा का?

BMC Election 2022 Shankarwadi ((Ward 81) : 2017ची निवडणूक अधिक रंजक ठरली होती. 2017मध्ये वॉर्ड क्रमांक 81 ओबीसींसाठी राखीव होता. या निवडणुकीत शिवसेनेकडून संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती.

BMC Election 2022 Shankarwadi Ward 81 : दैव देते अन्... मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 81वरच सर्वांच्या नजरा का?
मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 81वरच सर्वांच्या नजरा का?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 12:54 PM

मुंबई: मुंबई महापालिका (bmc) निवडणुकीला अजून अवकाश आहे. पण त्या आधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षण सोडत (ward reservation) जाहीर झाल्यापासून तर या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही नगरसेवकांनी वॉर्ड आरक्षित न झाल्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तर काहींना वॉर्ड आरक्षित झाल्याने टेन्शन आलं आहे. जिथे महिलांसाठी वॉर्ड आरक्षित झाले आहेत, त्या वॉर्डातील नगरसेवक पत्नी, मुलगी, आई, बहीण आणि सून यांना निवडणुकीत कसे तिकीट मिळावं म्हणून प्लानिंग करताना दिसत आहे. वॉर्ड क्रमांक 81ची झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक संदीप नाईक (sandeep naik) यांचा हा वॉर्ड आहे. पण त्यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने या वॉर्डीतील गणितच बदललं आहे. विशेष म्हणजे नाईक हे पहिल्यांदाच महापालिकेत निवडून आले होते. दुसऱ्यांदा महापालिकेत जाण्याची त्यांची संधी हुकली आहे. त्यामुळे नाईक आता काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आधी पराभव, नंतर विजय

2017ची निवडणूक अधिक रंजक ठरली होती. 2017मध्ये वॉर्ड क्रमांक 81 ओबीसींसाठी राखीव होता. या निवडणुकीत शिवसेनेकडून संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती. नाईक पहिल्यांदाच निवडणुकीत उभे होते. तर भाजपने मुरजी पटेल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. यावेळी मुरजी पटेल यांना 10 हजार 867 मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या संदीप नाईकांना 7 हजार 393 मते मिळाली होती. या निवडणुकीत पटेल हे तब्बल साडेतीन हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र, पटेल यांचं ओबीसी असल्याचं प्रमाणपत्रं बोगस असल्याचं सांगून कोर्टात धाव घेतली होती. कोर्टात हा खटला चालला. वर्षभरातच त्याचा निकाल आला. यावेळी कोर्टाने पटेल यांचं जात प्रमाणपत्रं बोगस असल्याचं मान्य करत पटेल यांचं नगरसेवकपद रद्द केलं. तसेच दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या नाईक यांना नगरसेवक म्हणून घोषित केलं होतं.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017  (bmc election result 2017 winner, party wise)

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

पण तोंडचा घास गेला

2017च्या निवडणुकीत पराभूत होऊनही केवळ दैव बलवत्तर म्हणून नाईक यांना नगरसेवकपदाची संधी मिळाली. त्यामुळे आताही नाईक यांना संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. ते दुसऱ्यांदा नगरसेवक होतील असा सर्वांनाच विश्वास होता. पण आरक्षण सोडतीत त्यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने महापालिकेत जाण्याची त्यांची संधी हुकली आहे. त्यामुळे आता नाईक हे तिकीट कुटुंबाकडे आणण्यात यशस्वी ठरतात की शिवसेना या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी देते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहेत.

अशी झाली लढत (उमेदवारांची नावे आणि मते)

सीमा बनसोडे (राष्ट्रवादी) – 206 ज्योती बिर्जे (काँग्रेस) – 2740 संतोष गिरी (मनसे) – 728 संदीप नाईक (शिवसेना) – 7393 मुरजी पटेल (भाजप) – 10767 सागर पोतूल (अपक्ष) – 59 नोटा – 362

17,396 मते बाद

या वॉर्डाची लोकसंख्या 56,642 इतकी आहे. या वॉर्डात अनुसूचित जातीची लोकसंख्या 961 असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 560 आहे. तर या मतदारसंघात गेल्यावेळी 39 हजार 751 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. त्यापैकी 22 हजार 355 मते वैद्य ठरली होती. म्हणजे एकूण 17,396 मते बाद ठरली होती.

कसा आहे वॉर्ड?

या वॉर्डात आघाडी नगर, प्रभागात शंकरवाडी, शेर-ए- पंजाब कॉलनी, गुंदवली, एमआयडीसी, मरोळ बस डेपो, हनुमान नगर, ईएसआयसी हॉस्पिटल आदी प्रमुख वस्त्या येतात. या वस्त्यांमधूनच उमेदवारांचं भवितव्य ठरत असतं.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.