नारायण राणेंना 9 चा फेरा, मुंबईतल्या अधिश बंगल्यात किती ठिकाणी बेकायदा बांधकाम? बीएमसीची नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जुहू येथील 'आधीश' बंगल्यात 9 ठिकाणी बेकायदा बदल केल्याचे मुंबई महापालिकेच्या पथकाच्या पाहणीत आढळले आहे. या प्रकरणी आता दोन आठवड्यानंतर मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नारायण राणेंना 9 चा फेरा, मुंबईतल्या अधिश बंगल्यात किती ठिकाणी बेकायदा बांधकाम? बीएमसीची नोटीस
नारायण राणे
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 9:17 AM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जुहू येथील ‘आधीश’ बंगल्यात 9 ठिकाणी बेकायदा बदल (unauthorized construction) केल्याचे मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) पथकाच्या पाहणीत आढळले आहे. या प्रकरणी आता दोन आठवड्यानंतर मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 2009 मध्ये बांधलेल्या जुहू येथील अधीश बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव आणि इमारत कारखाने विभागाच्या संयुक्त पथकाने दोन आठवड्यापूर्वी बंगल्याची पाहणी केली होती. या पथकात के- पश्चिमचे साहायय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांच्यासह अभियंते अधिकाऱ्यांसह नऊ जणांचा समावेश होता. या पाहाणीत संबंधित बंगल्यात 9 ठिकाणी बेकायदा बदल केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नारायण राणे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. हे बांधकाम महापालिकेने दिलेल्या मुदतीत न हटवल्यास महापालिकेच्या वतीने बंगल्यावर कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे दिशा सालियन संदर्भात राणे यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांची पोलिसांनी तब्बल 9 तास कसून चौकशी केली आहे. त्यामुळे नारायण राणे यांना 9 चा फेरा पडला की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

या ठिकाणी करण्यात आले बदल

1) पहिल्या मजल्यावरील उद्यानासाठीच्या जागेत रूम 2) दुसऱ्या मजल्यावरील उद्यानासाठीच्या जागेत रूम 3) तिसऱ्या मजल्यावरील उद्यानाच्या जागेत रूम 4) चौथ्या मजल्यावर टेरेस उद्यानासाठीच्या जागेत रूम 5) पाचव्या मजल्यावर टेरेस उद्यानासाठीच्या जागेत रूम 6) सहाव्या मजल्यावर टेरेस उद्यानासाठीच्या जागेत रूम 7) आठव्या मजल्यावरील पॉकेट टेरेसमध्ये रूम 8) टेरेस फ्लोअरचा रूम म्हणून वापर 9) पार्किंगमधील बेसमेंट सर्व्हिस भागाचा राहण्यासाठी वापर

राणे, शिवसेना पुन्हा आमने-सामने

मुंबई महापालिकेकडून नारायण राणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. नारायण राणे यांना ही दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे. जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता नारायण राणे आणि महाविकास आघाडी प्रामुख्यानं शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिकेनं यावेळी नारायण राणे यांना नोटीस पाठवताना फ्लोअर नुसार पाठवली आहे. बंगल्याच्या बांधकामात एसएफआयचं उल्लंघन झाल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Raju Patil : ऐरोली काटई टनेल 10 आणि मेट्रो 15 वर्षे डोंबिवलीत येणार नाही, या फक्त नेहमीप्रमाणेच थापा : राजू पाटील

प्रत्येक पक्षात नारद असतात, त्यांना सांभाळलं तरच निवडणुका मविआ म्हणून लढू, गुलाबराव पाटील यांच्या निशाण्यावर कोण?

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील 800 कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.