Devendra Fadanvis| मागच्यावेळीच भाजपचा मुंबईत महापौर होणार होता, पण मित्रपक्षासाठी आपण दोन पावलं मागे गेलो; फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' आता आपल्याला मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा आहे. तारीख पे तारीख नाही. मुंबईच्या समस्यांचे आरोपी कोण हे जनतेला विचारायचं आणि जनतेला सांगायचं न्यायाधीश तुम्ही आरोपी हे आता न्याय मुंबईकरता करा.

Devendra Fadanvis| मागच्यावेळीच भाजपचा मुंबईत महापौर होणार होता, पण मित्रपक्षासाठी आपण दोन पावलं मागे गेलो; फडणवीसांचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 2:09 PM

मुंबईः मुंबई महापालिकांच्या (BMC Election) मागील निवडणुकांमध्ये आम्ही भाजपचा महापौर बसवू शकलो असतो. पण मित्रपक्षासाठी आम्ही दोन पावलं मागे आलो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित भाजप मेळाव्यात ते बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज प्रचाराचं रणशिंग फुंकलं. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपने मुंबईच्या शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर आज महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपने भव्य मेळावा आयोजित केला. मुंबईकरांना प्रिय असलेले सर्वच सण उत्सव आता दणक्यात साजरे होणार, कुणीही घरी बसणार नाही, कुणाला घरी बसू देणार नाही, असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं.

महापौर आमचाच असता….

मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत शिवसेनाचा महापौर बसवण्यात आला.. पण त्या वेळी भाजपचा महापौर होऊ शकला असता, अशी माहिती पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, ‘ आपली तयारी झाली होती. पण मित्र पक्षासाठी दोन पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला. आता आपलाच महापौर बसेल. शिवसेना भाजप युतीचा महापौर बसेल. आपला भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही. आशिष तुम्ही क्रिकेट खेळणारे आहात आणि जाणाणारे आहात. त्यामुळे तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची तुम्हाला माहीत आहे. हा सामना तुम्ही जिंकणारच आहात. एमसीएमध्ये शेलारांनी मुंबई प्रीमीयर लिग सुरू केली आहे. आता पालिकेत मुंबई महापालिका विकास लीग तयार करायची आहे. मध्ये एखादा फुटबॉल आला अडथळा आला तर त्याला किक कशी मारायची हे तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही दोरी उड्या असोसिएशनचे अध्यक्ष आहात. त्यामुळे कुणी कितीही उड्या मारल्या तरी त्याला किती उड्या मारू द्यायच्या हे तुम्हाला माहीत आहे. मागचा आपला स्ट्राईक रेट मोठा होता. 35 वरून 80 वर आलो. आता आपला स्ट्राईक रेट मागचा रेकॉर्ड मोडणारा असला पाहिजे याकडे आमची नजर आहे…..

आता कुणीही घरी बसणार नाही…

उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ तुम्ही कालची मुंबई पाहिली का. तीच परंपरा संस्कृती ही आपली परंपरा आहे. आपलं सरकार आल्यावर काय घडतं हे सर्व सर्वांनी पाहिलं. आता सर्व जोरात करायचं आहे. गणेशोत्सव जोरात, नवरात्र जोरात, दिवाळी जोरात, आंबेडकर जयंती जोरात आणि शिवजयंतीही जोरात. आता सर्व जोरात करायचं आहे. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाही. आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाही. खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या दोन कार्यकर्त्यांचा आपण सत्कार केला. मंगल प्रभात लोढा यांनी तीन वर्ष समर्थपणे मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. कोरोनाच्या काळातही चांगल्या अॅक्टिविटी केली. एकही दिवस भाजप शांत बसला नाही. वेगवेगळ्या मोर्चाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणलं. या मुंबई भाजपला लोढा यांनी बहुजन आणि सर्वव्यापी चेहरा दिला.

मुंबईच्या समस्यांचे आरोपी कोण?

मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ आता आपल्याला मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा आहे. तारीख पे तारीख नाही. मुंबईच्या समस्यांचे आरोपी कोण हे जनतेला विचारायचं आणि जनतेला सांगायचं न्यायाधीश तुम्ही आरोपी हे आता न्याय मुंबईकरता करा. मुंबईकरांसाठी ज्यावेळी ते न्याय करतील तेव्हा मुंबईत सत्ता पालट झालेलं असेल. जनतेच्या मनातून फायनल जजमेंट येईल. याचा मला विश्वास आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.