AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर…; बच्चू कडू यांनी भाजपला ‘त्या’ घटनेची आठवण करून दिली

Bacchu Kadu on Anil Bonde : फडणवीस आणि शिंदे यांची तुलना कधीच होऊ शकत नाही, कारण...; बच्चू कडू यांनी सुनावलं

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर...; बच्चू कडू यांनी भाजपला 'त्या' घटनेची आठवण करून दिली
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 11:42 AM

मुंबई : मुंबईच्या बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींची आमदार बच्चू कडू यांनी भेट घेतली. आदिवासींची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन आदिवासींच्या मूलभूत सुविधा आणि पुनर्वसन याबाबत चर्चा केली. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी भाजप आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आठवण करून दिली आहे.

देशात नरेंद्र मोदी तर राज्यात एकनाथ शिंदे अशी जाहिरात वर्तमान पत्रात झळकली.  बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, असं उदाहरण देत अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर टीका केली आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनिल बोंडेला माहित नाही की आज आपल्याला जो आदर आहे कशामुळे आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केला नसता तर हे सगळं घडलं असतं का? अनिल बोंडेंना समजावून सांगितलं पाहिजे की, या संपूर्ण प्रकरणात भोंडे यांच्या बोलण्यामुळे पक्ष आणि सरकार दोन्हीमध्ये अडचण निर्माण झाली आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. अजित पवार आणि शरद पवार यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र आणि रावणाची तुलना होऊ शकत नाही, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कधीच होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा विषय आहे. प्रत्येकाची प्रतिष्ठा वेगळी आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.

उल्हासनगरमधील भाजपच्या पोस्टरवरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही कोणाचेही बॅनर लावू शकतो. काहीही लिहू शकतो. त्या बॅनरला काही अर्थ आहे का? त्या बॅनरला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं ते म्हणालेत.

बच्चू कडू यांनी आदिवासी प्रश्नांवरही प्रतिक्रिया दिली आहे. आदिवासी पाड्यात पाण्याची लाईन नाही. मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. राष्ट्रीय उद्यानाच्या नावाखाली ही सुविधा बंद केली आहे. आज मी अधिकाऱ्यांशी बोललो. सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही बोललो. उच्च न्यायालयाच्या निर्णयात मुलभूत सुविधा देता येत नाहीत, हे चुकीचे आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.