Shivsena Dasara Melava : ठरलं तर! शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच; महापालिकेकडून परवानगी

Shivsena Uddav Thackeray Group Dasara Melava at Shivaji Park : ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. यंदा होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे या दसरा मेळाव्यात काय बोलतात, हे पाहणं महत्वाचं असेल.

Shivsena Dasara Melava : ठरलं तर! शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच; महापालिकेकडून परवानगी
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 12:12 PM

विनायक डावरूंग, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 12 ऑक्टोबर 2023 : 24 ऑक्टोबर… दसऱ्याचा दिवस. या दिवशी शिवसेना पक्षाच्या परंपरे प्रमाणे दसरा मेळावा पार पडेल. कारण, मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवतीर्थवर पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनींनो… असं संबोधन ऐकायला मिळेल. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थितांना संबोधित करतील. त्यामुळे पुन्हा एकदा 24 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांची तोफ मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात धडाडणार आहे.

दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा, यासाठी ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला. या अर्जाची दखल घेत मुंबई महापाहिकेने ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट दोघेही उत्सुक होते. तसा अर्ज दोन्ही बाजूने करण्यात आला होता. मात्र शिंदे गटाने आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आता शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे.

दसरा मेळावा ही शिवसेना पक्षाची परंपरा आहे. मागच्या अनेक वर्षात ही परंपरा मोडलेली नाही. मागच्या वर्षी शिवसेनेत दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. मागच्या वर्षीही त्यांनी इथेच मेळावा घेता यावा यासाठी अर्ज केला. पण परवानगी न मिळाल्याने अखेर त्यांनी वांद्र्यातील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेतला. शिवसेनेतील फुटीनंतरचा हा पहिला दसरा मेळावा होता.

मागच्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा समाचार घेतला. तर एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. आता यंदा हे दोनही नेते या दसरा मेळव्यात काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.